शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
5
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
6
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
7
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
9
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
10
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
11
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
12
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
13
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
14
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
15
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
16
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
17
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
18
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
19
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
20
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 

नागपूरच्या नागनदी विकासाचा सप्टेंबरपर्यंत आराखडा द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 10:41 PM

नागनदी विकास प्रकल्पात समावेश असलेले नदी काठावरील सौंदर्यीकरण, पाण्याचे शुद्धीकरण व जमीन अधिग्रहण याबाबतचा प्राथमिक आराखडा सप्टेबर २०१८ पर्यंत महापालिकेला सादर करण्याची सूचना आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी केली. ‘नाग रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंट’ प्रकल्पांतर्गत प्रस्तावित असलेल्या नाग नदी विकास आराखड्यासंदर्भात मंगळवारी महापालिका मुख्यालयात फ्रान्स येथील एजन्सी आॅफ फ्रेन्च डेव्हलपमेंट (एएफडी)च्या प्रतिनिधींसोबत महापालिकेच्या एनएसईएल आणि नागपूर स्मार्ट अ‍ॅण्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कापोर्रेशनच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक पार पडली. यात नाग नदी विकासाच्या प्रस्तावित विकास आराखड्यावर चर्चा करण्यात आली.

ठळक मुद्देआयुक्तांची सूचना : प्रकल्पावर संयुक्त बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागनदी विकास प्रकल्पात समावेश असलेले नदी काठावरील सौंदर्यीकरण, पाण्याचे शुद्धीकरण व जमीन अधिग्रहण याबाबतचा प्राथमिक आराखडा सप्टेबर २०१८ पर्यंत महापालिकेला सादर करण्याची सूचना आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी केली. ‘नाग रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंट’ प्रकल्पांतर्गत प्रस्तावित असलेल्या नाग नदी विकास आराखड्यासंदर्भात मंगळवारी महापालिका मुख्यालयात फ्रान्स येथील एजन्सी आॅफ फ्रेन्च डेव्हलपमेंट (एएफडी)च्या प्रतिनिधींसोबत महापालिकेच्या एनएसईएल आणि नागपूर स्मार्ट अ‍ॅण्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कापोर्रेशनच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक पार पडली. यात नाग नदी विकासाच्या प्रस्तावित विकास आराखड्यावर चर्चा करण्यात आली.बैठकीला आयुक्तासह नागपूर स्मार्ट अ‍ॅण्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉपोर्रेशन लि.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रामनाथ सोनवणे, एनईएसएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रिजवान सिद्दिकी, उपायुक्त डॉ. रंजना लाडे, उपायुक्त रवींद्र देवतळे, अतिरिक्त उपायुक्त राजेश मोहिते, अतिरिक्त उपायुक्त जयंत दांडेगावकर, सहायक वनसंरक्षक व्ही.एस. उमाळे, एएफडीचे नगर विकास प्रकल्प अधिकारी एंटोनी बेज, क्लेमन्स, विडाल डी ले ब्लिलकॅच , गौतियन कोहलर, पॅरिस येथील सिग्नेस कंपनीच्या वास्तुविशारद सिबिला जॅक्सिक, पी.के. दास अ‍ॅन्ड असोसिएटस् मुंबई येथील वास्तुविशारद समर्थ दास, एनएसएससीडीसीएलचे महाव्यवस्थापक उदय घिये, महाव्यवस्थापक (पर्यावरण) देवेंद्र महाजन, तांत्रिक सल्लागार विजय बनगीरवार, मुख्य अभियंता मनोज तालेवार उपस्थित होते.यावेळी सिग्नेस कंपनीच्या आर्किटेक्ट सिबिला जॅक्सिक आणि पी.के. दास अ‍ॅण्ड असोशिएटस्चे समर्थ दास यांनी नाग नदीच्या विकास आराखड्याचे सादरीकरण केले. नाग नदीच्या तीरावरील सौंदर्यीकरण, त्यासाठी असलेली जमिनीची आवश्यकता, पाण्याची शुद्धीकरण आदीबाबत त्यांनी माहिती दिली. नाग नदीचे उगमस्थान अंबाझरी ओव्हलफ्लो पासून प्रजापती नगर पारडीपर्यंतच्या नाग नदीच्या तीरावर काय-काय केले जाऊ शकते, याबाबत माहिती दिली.एएफडीने यावेळी नाग नदी रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंट प्रकल्पांतर्गत पुढील वर्षभरात राबविण्यात येणाºया उपक्रमांची माहिती दिली. यावेळी उपअभियंता (नद्या व सरोवरे) मो. इसराईल, उपअभियंता राजेश दुफारे, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. प्रदीप दासरवार, कार्यकारी अभियंता डी.डी. जांभूळकर उपस्थित होते.

टॅग्स :Naag Riverनाग नदीNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका