शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे २५-३० आमदार फोडण्याचं उद्धव ठाकरेंचं प्लॅनिंग झालं होतं; एकनाथ शिंदेंचा नवा दावा
2
Kangana Ranaut : "निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
3
बारामतीत गुंडांकडून प्रचार, रोहित पवार आणि अमोल मिटकरी आमने-सामने, गंभीर आरोप प्रत्यारोप
4
Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील खासदारांचं प्रगतीपुस्तक; लोकसभेत कशी राहिली कामगिरी?
5
'घरी जा, टीव्हीवर पाहा, माल पकडताहेत मोदी...'; झारखंडच्या छाप्यात नोटांच्या ढिगाऱ्याबाबत पंतप्रधान म्हणाले,...
6
रोकड पाहून अधिकारी चक्रावले; ED च्या छापेमारीवर काँग्रेस नेते आलमगीर यांची पहिली प्रतक्रिया
7
राज ठाकरेंच्या नावाचा विचार करावा, आनंद दिघेंच्या 'त्या' विधानानंतर काय घडलं?; CM शिंदेंचा गौप्यस्फोट
8
“पंतप्रधान मोदींना यावे लागते, महाराष्ट्रातील पराभव महायुतीला स्पष्ट दिसतो आहे”: अमोल कोल्हे
9
Acharya Pramod Krishnam : "जो PM मोदींसोबत नाही, तो देशद्रोही", आचार्य प्रमोद कृष्णम यांच्या विधानावरून वाद
10
व्हॉट्सॲपच्या एका फिचरवरुन सरकारसोबत वाद, भारतात WhatsApp बंद होणार?
11
एका दिवसात ₹११७० कोटींनी कमी झाली Rekha Jhunjhunwala यांची संपत्ती, टाटाचा 'हा' शेअर आपटला
12
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
13
“RSS-हेमंत करकरे यांच्यात संघर्ष, संघाचे लोक माझ्याकडे यायचे अन्...”; राऊतांचा मोठा दावा
14
T20 World Cup : बाबरने केली रोहितची कॉपी; वर्ल्ड कप जिंकण्यासाठी पाकिस्तानची सांगितली रणनीती
15
'साहेब, तब्येतीला जपा! विजय तुमच्या पायावर आणून ठेवतो',शरद पवारांसाठी बजरंग सोनवणेंची पोस्ट
16
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
17
Income Tax Saving Tips: EEE कॅटेगरीत येतात 'या' ४ स्कीम्स, यात पैसे गुंतवाल तर ३ पद्धतीनं वाचेल टॅक्स
18
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: बुध म्हणजे 'राजकुमार'; उत्तम वाणी, प्रखर बुद्धी, चिरतारुण्याचं वरदान
19
‘पुंछमध्ये IAF च्या ताफ्यावर झालेला हल्ला ही स्टंटबाजी, जेव्हा निवडणुका येतात तेव्हा..’ काँग्रेस नेते चरणजीत सिंग चन्नी यांचं विधान
20
PHOTOS : मोकळे केस अन् घायाळ करणाऱ्या अदा; धनश्री वर्माचा बोल्ड लूक!

पाकिस्तानातील निर्वासित हिंदूंना भारताचे नागरिकत्व द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2018 10:18 PM

पाकिस्तानातील हिंदूंवर सातत्याने अत्याचार होत आहेत. बळजबरीने धर्मांतर, प्राणघातक हल्ले, महिलांवर अत्याचार होत असून पाकिस्तानातील अशा निर्वासित हिंदूंना भारताचे नागरिकत्व द्या आणि इतर मागण्यांसाठी राष्ट्रीय हिंदू आंदोलनाच्या वतीने झांशी राणी चौकात शासनाच्या विरोधात नारेबाजी करण्यात आली.

ठळक मुद्देराष्ट्रीय हिंदू आंदोलन : झांशी राणी चौकात निदर्शने

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : पाकिस्तानातील हिंदूंवर सातत्याने अत्याचार होत आहेत. बळजबरीने धर्मांतर, प्राणघातक हल्ले, महिलांवर अत्याचार होत असून पाकिस्तानातील अशा निर्वासित हिंदूंना भारताचे नागरिकत्व द्या आणि इतर मागण्यांसाठी राष्ट्रीय हिंदू आंदोलनाच्या वतीने झांशी राणी चौकात शासनाच्या विरोधात नारेबाजी करण्यात आली.झांशी राणी चौकात मंगला पागनीस, अभिजित पोलके, रमेश अगरवाल यांच्या नेतृत्वात आंदोलन करून शासनाच्या विरोधात नारेबाजी करण्यात आली. आंदोलनात पाकिस्तानातील निर्वासित हिंदूंवरील अत्याचार रोखण्यासाठी त्यांना भारताचे नागरिकत्व देण्याची मागणी करण्यात आली. हिंदू मंदिरातील पैसा सामूहिक विवाह सोहळ्यांवर नव्हे तर धर्म कार्यासाठीच वापरण्यात यावा, अशी भूमिका मांडण्यात आली. याशिवाय तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी लिंगायत धर्म तयार करावा असा घातलेला घाट चुकीचा असून हिंदू धर्मापासून लिंगायत समाज वेगळा करण्याला विरोध दर्शविण्यात आला. तेलंगणाचे आमदार राजासिंग ठाकूर यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याचा निषेध करून हल्लेखोरांवर कारवाई करण्याची मागणी करून या मागे हिंदू नेत्यांना मारण्याचे षड्यंत्र असल्याचा आरोप आंदोलनादरम्यान करण्यात आला. याबाबत सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे. आंदोलनात मंगला पागनीस, अभिजित पोलके, रमेश अगरवाल यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

टॅग्स :Hindu Janajagruti Samitiहिंदू जनजागृती समितीagitationआंदोलन