नागपूर रेल्वेस्थानकानजीक दक्षिण एक्स्प्रेसमध्ये युवतीची छेडखानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 23:08 IST2018-01-30T23:07:28+5:302018-01-30T23:08:24+5:30

दक्षिण एक्स्प्रेसमध्ये पेन्ट्रीकार कर्मचाऱ्याने एका युवतीची छेडखानी केल्यामुळे एकच खळबळ उडाली. दरम्यान, संबंधित युवतीच्या नातेवाईकांनी नरखेड रेल्वेस्थानकावर पेन्ट्रीकार कर्मचाऱ्यांना मारहाण केल्यामुळे ते पळून गेल्याची माहिती सूत्रांनी दिली.

The girl's molestation in South Express near Nagpur railway station | नागपूर रेल्वेस्थानकानजीक दक्षिण एक्स्प्रेसमध्ये युवतीची छेडखानी

नागपूर रेल्वेस्थानकानजीक दक्षिण एक्स्प्रेसमध्ये युवतीची छेडखानी

ठळक मुद्देपेन्ट्रीकार कर्मचाऱ्याचे कृत्य

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दक्षिण एक्स्प्रेसमध्ये पेन्ट्रीकार कर्मचाऱ्याने एका युवतीची छेडखानी केल्यामुळे एकच खळबळ उडाली. दरम्यान, संबंधित युवतीच्या नातेवाईकांनी नरखेड रेल्वेस्थानकावर पेन्ट्रीकार कर्मचाऱ्यांना मारहाण केल्यामुळे ते पळून गेल्याची माहिती सूत्रांनी दिली.
नागपुरातील ११ युवक आणि ११ युवतींची चमू अमृतसर येथील क्रीडा स्पर्धेसाठी गेली होती. परत येताना ही चमू रेल्वेगाडी क्रमांक १२७२२ नवी दिल्ली-हैदराबाद दक्षिण एक्स्प्रेसच्या कोच क्रमांक एस-७ ने दिल्ली ते नागपूर असा प्रवास करीत होती. यात नरखेड येथील एका युवतीचा समावेश होता. दरम्यान, सकाळी ६.३० वाजता या चमूतील नरखेडच्या मोवाड येथील रहिवासी असलेली युवती ललितपूर स्थानकावर शौचासाठी गेली. तेथे पेन्ट्रीकार कर्मचाºयाने तिची छेड काढली. संबंधित युवतीने याची माहिती आपले सहकारी आणि मोबाईलवर नातेवाईकांना दिली. याबाबत रेल्वे सुरक्षा दल आणि लोहमार्ग पोलिसांच्या हेल्पलाईनवरही सूचना देण्यात आली. नरखेडला दक्षिण एक्स्प्रेस थांबल्यानंतर संबंधित युवतीच्या नातेवाईकांनी पेन्ट्रीकार कर्मचाऱ्यांना मारहाण केल्यामुळे ते पळून गेल्याची माहिती आहे. सायंकाळी ६.४५ वाजता दक्षिण एक्स्प्रेस नागपुरात प्लॅटफार्म क्रमांक २ वर आली. दरम्यान, लोहमार्ग पोलीस आणि रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी पेन्ट्रीकार कर्मचाऱ्यांचा शोध घेतला असता, ते पेन्ट्रीकार बंद करून निघून गेल्याचे आढळले. गाडीतील टीसीनेही पेन्ट्रीकार कर्मचाऱ्यांबाबत काहीच माहिती नसल्याची माहिती दिली. अखेर लोहमार्ग पोलीस उपनिरीक्षक सुशील पांडे हे रात्री उशिरा महिला पोलिसांना सोबत घेऊन संबंधित युवतीचे बयान नोंदविण्यासाठी नरखेडला रवाना झाले.

Web Title: The girl's molestation in South Express near Nagpur railway station