नागपुरात भररस्त्यावर तरुणीचा विनयभंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2018 21:19 IST2018-09-22T21:17:02+5:302018-09-22T21:19:34+5:30
लहान बहिणीसोबत घरी जात असलेल्या एका तरुणीचा पाठलाग करून तिला रस्त्यात अडवल्यानंतर एक सराईत गुन्हेगार आणि त्याच्या एका साथीदाराने तरुणीसोबत लज्जास्पद वर्तन केले. तरुणीची आरडाओरड ऐकून आजूबाजूची मंडळी धावल्याने आरोपी पळून गेले. शुक्रवारी रात्री ७.३० ते ७.४५ या वेळेत लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

नागपुरात भररस्त्यावर तरुणीचा विनयभंग
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लहान बहिणीसोबत घरी जात असलेल्या एका तरुणीचा पाठलाग करून तिला रस्त्यात अडवल्यानंतर एक सराईत गुन्हेगार आणि त्याच्या एका साथीदाराने तरुणीसोबत लज्जास्पद वर्तन केले. तरुणीची आरडाओरड ऐकून आजूबाजूची मंडळी धावल्याने आरोपी पळून गेले. शुक्रवारी रात्री ७.३० ते ७.४५ या वेळेत लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
नंदनवन परिसरात राहणारी तरुणी (वय २०) शुक्रवारी रात्री कॉम्प्युटर क्लास आटोपून लहान बहिणीसोबत घरी परत जात होती. आरोपी पंकज चव्हाण आणि त्याच्या एक साथीदाराने दुचाकीने (एमएच ४९/ डब्ल्यू ०२५८) ने पाठलाग करून छापरूनगर चौक ते भवानी टिंबर मार्टच्या दरम्यान तिला अडवले. तिचा हात पकडून आरोपीने तिला अश्लील शिवीगाळ करून तिचा विनयभंग केला. तरुणी आणि तिच्या बहिणीने आरडाओरड केल्याने आजूबाजूची मंडळी धावली. ते पाहून आरोपी पळून गेले. माहिती कळताच लकडगंजचे पोलीस उपनिरीक्षक ठाकूर आल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहचले. तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून लकडगंज पोलिसांनी आरोपी पंकज चव्हाण आणि त्याच्या साथीदाराविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. आरोपीच्या दुचाकीच्या क्रमांकावरून पोलीस पंकजच्या गरोबा मैदान परिसरातील घरी गेले. मात्र, आरोपी आपली दुचाकी सोडून पळून गेला. पोलिसांनी त्याची दुचाकी जप्त केली. आरोपी पंकज हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्याविरुद्ध यापूर्वीही विनयभंगासह अनेक गुन्हे दाखल असल्याचे पोलीस सांगतात. आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.