शाळेच्या लॅबमध्ये मुलीवर अत्याचार; निवृत्तीला आलेल्या शिक्षकाचे कुकृत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2023 07:12 IST2023-04-13T07:12:15+5:302023-04-13T07:12:26+5:30

एका गणिताच्या शिक्षकाने अवघ्या १२ वर्षीय विद्यार्थिनीच्या आयुष्याला उद्ध्वस्त करून टाकले आहे.

Girl molested in school lab Misdeeds of a retired teacher | शाळेच्या लॅबमध्ये मुलीवर अत्याचार; निवृत्तीला आलेल्या शिक्षकाचे कुकृत्य

शाळेच्या लॅबमध्ये मुलीवर अत्याचार; निवृत्तीला आलेल्या शिक्षकाचे कुकृत्य

नागपूर :

एका गणिताच्या शिक्षकाने अवघ्या १२ वर्षीय विद्यार्थिनीच्या आयुष्याला उद्ध्वस्त करून टाकले आहे. संबंधित शिक्षकाने सुमारे पाच महिने सहावीतील विद्यार्थिनीवर अत्याचार केला. धक्कादायक बाब म्हणजे शाळेच्या प्रयोगशाळेतच त्याने अनेकदा कुकृत्य केले. शिक्षकाला पोलिसांनी अटक केली आहे. 

संजय विठ्ठल पांडे (५७) असे आरोपी शिक्षकाचे नाव आहे. सक्करदरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील १२ वर्षीय विद्यार्थिनी शाळेत सहावी इयत्तेत आहे. आरोपीने तिला विश्वासात घेऊन प्रेम असल्याचे सांगितले व तिच्याशी लग्नाची इच्छा प्रदर्शित केली.  विद्यार्थिनी त्याच्या जाळ्यात फसली. शिक्षकाने तिच्यावर शाळेतच अनेकदा अत्याचार केले. १० डिसेंबर २०२२ ते ५ एप्रिल २०२३ या कालावधीत हा प्रकार सुरू होता. मुलीला पोटदुखीचा त्रास झाल्यावर आईने विचारणा केली, तिने उडवाउडवीची उत्तरे दिली. ५ एप्रिलला आईने विश्वासात घेऊन विचारल्यावर तिने शिक्षकाचे कारनामे सांगितले. पेपर सुटल्यावरदेखील त्याने अत्याचार केला. हा प्रकार कुणाला सांगितल्यास जिवे मारण्याची धमकीही दिली होती. अखेर आईने पोलिसांत तक्रार नोंदविली. 

लक्षात का आले नाही ?
गणिताचा शिक्षक बहुतांश वेळा विद्यार्थिनीला विज्ञानाच्या प्रयोगशाळेत घेऊन जात असे. ही बाब शाळेत कुणाच्याही निदर्शनास का आली नाही ?  हा प्रश्न उपस्थित करत सेवानिवृत्तीला आलेल्या या वासनांध शिक्षकावर कठोर कारवाईची मागणी होत आहे.

Web Title: Girl molested in school lab Misdeeds of a retired teacher