शहरं
Join us  
Trending Stories
1
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
2
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
3
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
4
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
5
"अभी तो मै जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
6
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
7
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
8
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
9
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
10
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
12
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
13
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
14
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
15
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
16
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
17
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
18
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
19
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
20
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
Daily Top 2Weekly Top 5

गिरीशभाऊ राजकारणापलिकडचे व्यक्तिमत्त्व

By admin | Updated: March 8, 2015 02:34 IST

गिरीश गांधी यांच्याशी माझे जवळचे संबंध आहेत. ९० टक्के लोक ढोंगीपणाने वागत असताना त्यांच्यातला सच्चेपणा मी अनुभवला आहे.

नागपूर : गिरीश गांधी यांच्याशी माझे जवळचे संबंध आहेत. ९० टक्के लोक ढोंगीपणाने वागत असताना त्यांच्यातला सच्चेपणा मी अनुभवला आहे. त्यामुळेच गिरीशभाऊ कुठल्याही पक्षात असले, नसले तरी त्यांचा आदर आहे. सर्वच पक्षाच्या लोकांशी त्यांचे मैत्रीचे संबंध आहेत आणि ते राजकारणापलिकडचे व्यक्तिमत्त्व आहे. त्यामुळेच त्यांच्या नावाचे प्रतिष्ठान समाजाला उपयोगी काम करीत राहील याचा विश्वास वाटतो, असे मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक आणि जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी व्यक्त केले. साई सभागृह, शंकरनगर येथे गिरीश गांधी यांच्या मित्र परिवारातर्फे गिरीश गांधी प्रतिष्ठानचे उद्घाटन नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी तो बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे, अजय पाटील, माधवराव देशपांडे, अरुण वानखेडे, संतोष क्षीरसागर, नंदकिशोर पनपालिया प्रामुख्याने उपस्थित होते. गडकरी म्हणाले, गिरीश गांधी सर्व पक्षातल्या नेत्यांना मार्गदर्शन करणारे नेते आहेत. एखादा अपवाद वगळता त्यांचे मी ऐकले नाही, असे सहसा होत नाही. निवडणुकीत त्यांनी माझ्यावर आणि पक्षावर केलेली टीका मला कधीच बोचली नाही. राजकारण समाजासाठी करायचे सत्तेसाठी नाही, हे त्यांनीच बिंबविले आहे. त्यांची आणि माझी मैत्री असली तरी मतभिन्नता आहे, पण त्यामुळे आमच्यात कधी दुरावा आला नाही. मतभिन्नतेपेक्षा विचारशून्यता जास्त घातक आहे. गिरीशभाऊंनी जो विचार दिला तो या प्रतिष्ठानच्यावतीने अधिक समोर जावा, असे आवाहन त्यांनी केले. कधीही लाचारी न पत्करणाऱ्या आणि परखड बोलणाऱ्या गिरीश गांधी यांची समाजाला जास्त गरज आहे, असे गडकरी म्हणाले. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, गिरीशभाऊंना गेले २० वर्षे मी पाहतो आहे. आदर्श आणि निष्कंलक चारित्र्य असणाऱ्या गिरीशभाऊंकडून मंत्री झाल्यावर अनेक संकल्पना मला मिळाल्या. त्यावर मी काम करीत आहे. एलईडी दिवे उपयोगात आणले तर ५० टक्के विजेची बचत होते. त्यासाठी त्यांनी एक लाख एलईडी दिवे शिर्डीत वितरित केले. यावर राज्य सरकारही आता काम करते आहे, असे ते म्हणाले. मधुकर भावे म्हणाले, स्पष्ट बोलणारी माणसे आणि परखड लिहिणारे पत्रकार आज नाहीत. अशा वेळी स्पष्ट बोलणाऱ्या गिरीशभाऊंची जास्त गरज आहे. पानसरे, दाभोळकर यांची हत्या झाली पण समाज चूप आहे. यावर बोलले पाहिजे. समाजाचा गढूळपणा वाढत असताना तो थोपविण्याची शक्ती गिरीश गांधी यांच्यासारख्या व्यक्तींमध्येच आहे. त्यामुळे गिरीशभाऊंनी विदर्भासह कोकण, मराठवाड्याकडेही आता लक्ष द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. याप्रसंगी प्रास्ताविकातून डॉ. अक्षयकुमार काळे यांनी प्रतिष्ठानचा उद्देश स्पष्ट केला. संचालन कोमल ठाकरे यांनी तर आभार अजय पाटील यांनी मानले. कार्यक्रमाला गिरीश गांधी, महेश एलकुंचवार प्रामुख्याने उपस्थित होते. (प्रतिनिधी)