कन्हान नदीवरील घाट तस्करांचे ‘टार्गेट’, रेतीचा अवैध उपसा अन् बेभाव विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 04:11 IST2020-11-28T04:11:03+5:302020-11-28T04:11:03+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : जिल्ह्यातील सात प्रमुख नद्यांवरील १०२ रेतीघाटांपैकी ११ घाटांची २०१९ मध्ये लिलाव मुदत संपुष्टात आली ...

कन्हान नदीवरील घाट तस्करांचे ‘टार्गेट’, रेतीचा अवैध उपसा अन् बेभाव विक्री
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जिल्ह्यातील सात प्रमुख नद्यांवरील १०२ रेतीघाटांपैकी ११ घाटांची २०१९ मध्ये लिलाव मुदत संपुष्टात आली आहे. त्यानंतर एकाही घाटाचा लिलाव करण्यात आला नाही. मात्र, रेतीचा अवैध उपसा आणि विक्री सुरूच आहे. ही रेती बाजारात दुप्पट ते तिप्पट दराने विकली जात आहे.
बाजारात कन्हान नदीतील तांबड्या रेतीला भरीव मागणी असल्याने रेतीतस्करांनी या नदीवरील घाटांना लक्ष्य केले आहे. पुरामुळे वाहात आलेली रेती नदीकाठच्या खड्डे व शेतात साचली जाते. ती काढण्यासाठी महसूल विभागाकडून परवानगी घेत शेतासाेबतच पात्रातील रेतीचा अवैध उपसा व वाहतूक केली जात आहे. त्यासाठी महसूल व पाेलीस यंत्रणा ‘मॅनेज’ केली जाते. यात राज्य शासनाचा महसूल बुडत आहे.
...
जिल्ह्यात कुठून येते वाळू
भंडारा व चंद्रपूर जिल्ह्यातील वैनगंगा नदीतील रेती भिवापूर, उमरेड व माैदा मार्गे तसेच मध्य प्रदेशातील साैंसर तालुक्यातील कन्हान नदीतील रेती केळवद (ता. सावनेर) मार्गे नागपूर जिल्ह्यात आणली जाते. ती रेती पुढे कळमेश्वर, काटाेल किंवा काेंढाळी मार्गे अमरावती जिल्ह्यात नेली जाते.
...
हरित लवादाची बैठक
नागपूर जिल्ह्यात हरित लवादाची अलीकडच्या काळात एकही बैठक झाली नाही. जिल्हा प्रशासनाने रेतीचाेरीला आळा घालण्यासाठी घाटांची ‘ड्राेन’द्वारे पाहणी करण्याची केलेली घाेषणा अमलात न आल्याने ती हवेत विरली.
..
रेतीचाेरी आळा घालण्यासाठी रेतीची वाहतूक करणाऱ्या प्रत्येक परवानाधारक ट्रकला बारकाेड डीपी लावली जाते. रेतीघाटांवर पाळत ठेवली जात असून, शासनाने दिलेल्या सर्व दिशानिर्देशांचे पालन केले जात आहे.
- डाॅ. गजानन कामडे,
जिल्हा खनिकर्म अधिकारी, नागपूर.