जर्मनीच्या शिष्टमंडळाचा फीडर सेवा आणि स्वच्छतेवर भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2018 22:46 IST2018-05-05T22:46:39+5:302018-05-05T22:46:56+5:30
महाराष्ट्र मेट्रो रेल कोपोर्रेशन लिमिटेड अंतर्गत सुरूअसलेल्या नागपूर मेट्रो प्रकल्पाच्या कार्याचा आढावा घेण्यासाठी नागपुरात आलेल्या केएफडब्लू डेव्हलपमेंट बँक, जर्मन सोसायटी फॉर इंटरनॅशनल को-आॅपरेशन (जीआयझेड) आणि आर्थिक सहकार व विकासाच्या (बीएमझेड) प्रतिनिधी मंडळाने शनिवारी नागपूर मेट्रोतून प्रवास करत प्रकल्पाची माहिती जाणून घेतली.

जर्मनीच्या शिष्टमंडळाचा फीडर सेवा आणि स्वच्छतेवर भर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महाराष्ट्र मेट्रो रेल कोपोर्रेशन लिमिटेड अंतर्गत सुरूअसलेल्या नागपूर मेट्रो प्रकल्पाच्या कार्याचा आढावा घेण्यासाठी नागपुरात आलेल्या केएफडब्लू डेव्हलपमेंट बँक, जर्मन सोसायटी फॉर इंटरनॅशनल को-आॅपरेशन (जीआयझेड) आणि आर्थिक सहकार व विकासाच्या (बीएमझेड) प्रतिनिधी मंडळाने शनिवारी नागपूर मेट्रोतून प्रवास करत प्रकल्पाची माहिती जाणून घेतली.
भारत आणि जर्मनी या दोन्ही देशांतर्गत झालेल्या कराराअंतर्गत वार्षिक आढावा बैठकीच्या निमित्ताने हा दौरा होता. आर्थिक विकासाबरोबर स्मार्ट सिटीकडे अग्रेसर नागपूर शहराच्या विकास आराखड्यासंबंधी चर्चा करण्याचा दौऱ्याचा मुख्य उद्देश होता. शिष्टमंडळाने फीडर सेवा, घनकचºयाचे व्यवस्थापन आणि स्वच्छतेवर भर दिला.
महामेट्रो प्रारंभीपासूनच ट्रान्झिट-ओरिएन्टेड डेव्हलपमेंट (टॉड), मल्टिमॉडल इंटिग्रेशन, सोलर एनर्जीचे एकत्रीकरण, फर्स्ट अॅण्ड लास्ट माईल कनेक्टिव्हिटी, फीडर सर्व्हिसवर कार्य करीत असल्याचे मेट्रोच्या पदाधिकाºयांनी शिष्टमंडळला सांगितले. शिष्टमंडळाने मेट्रोच्या संपूर्ण कार्याची प्रशंसा केली आणि मुख्यत्वे ५ डी बीम संकल्पनेवर मेट्रोचे कार्य वेळेआधी पूर्ण होत असल्याचा आनंद असल्याचे त्यांनी सांगितले. शिष्टमंडळात आर्थिक सहकार आणि विकास (बीएमझेड) फेडरल मिनिस्ट्री आॅफ दक्षिण एशिया डिव्हिजनचे डॉ. वॉल्फ्राम क्लाईन आणि लिसबेथ मुलर-होफ्स्टेड हे दोन अधिकारी आणि जर्मनीहून आलेल्या दहा प्रतिनिधींचा समावेश होता.
सिव्हिल लाईन्स येथील मेट्रो हाऊसमध्ये महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दीक्षित यांनी शिष्टमंडळाला प्रकल्पाची माहिती दिली. त्यानंतर शिष्टमंडळाने महामेट्रोच्या अधिकाºयांसोबत प्रकल्पाची पाहणी केली. शिष्टमंडळाने एअरपोर्ट(साऊथ) ते खापरीपर्यंत मेट्रोत प्रवास करून या मार्गावरील तिन्ही स्टेशनची पाहणी केली. कार्याविषयी मेट्रोचे अधिकारी आणि कर्मचाºयांचे कौतुक केले. यापूर्वी केएफडब्लू, जीआयझेड व बीएमझेड यांच्या शिष्टमंडळाने प्रकल्पाच्या रीच-२ आणि रीच-३ मधील कार्यक्षेत्रात सुभाषनगर मेट्रो स्थानक आणि कामकाजाच्या ठिकाणांनाही भेट देऊन कार्याची प्रशंसा केली. या वेळी महामेट्रोचे अधिकारी उपस्थित होते.