‘व्हिडीओ गेम’मधून ‘गेट! सेट! व्होट!’

By Admin | Updated: October 6, 2014 00:55 IST2014-10-06T00:55:37+5:302014-10-06T00:55:37+5:30

लोकशाही प्रणालीचा आधारस्तंभ असलेल्या निवडणुकांमध्ये मतदारांनी जास्तीत जास्त प्रमाणात मतदान करावे यासाठी सर्व स्तरांवरून आवाहन करण्यात येत आहे. युवा मतदारांना डोळ्यासमोर

'Gate' from 'Video Game' Set! Vote! ' | ‘व्हिडीओ गेम’मधून ‘गेट! सेट! व्होट!’

‘व्हिडीओ गेम’मधून ‘गेट! सेट! व्होट!’

मतदार जागृती: केंद्रीय निवडणूक आयोगाचे पाऊल
नागपूर : लोकशाही प्रणालीचा आधारस्तंभ असलेल्या निवडणुकांमध्ये मतदारांनी जास्तीत जास्त प्रमाणात मतदान करावे यासाठी सर्व स्तरांवरून आवाहन करण्यात येत आहे. युवा मतदारांना डोळ्यासमोर ठेवून केंद्रीय निवडणूक आयोगाने एक अभिनव पाऊल उचलले आहे. आपल्या देशातील मतदानपद्धती आणि लोकशाहीच्या मूल्यांची माहिती चक्क आता एका ‘व्हिडीओ गेम’च्या माध्यमातून जाणून घेता येणार आहे. ‘गेट!सेट! व्होट!’ असे या ‘गेम’चे नाव असून महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांच्या काळात याला ‘लॉन्च’ करण्यात आले आहे. ‘एन्टरटेन्मेन्ट कम एज्युकेशन’ असे या ‘गेम’चे स्वरूप आहे.
जास्तीत जास्त मतदान व्हावे याकरिता निवडणूक आयोगाकडून निरनिराळ्या मोहिमा नेहमीच राबविण्यात येतात. यात सोशल नेटवर्किंग, तंत्रज्ञान यांचीदेखील मदत घेण्यात येते.
तरुण मतदारांची संख्या लक्षात घेता हा अनोखा ‘व्हिडीओ गेम’ तयार करण्यात आला आहे. निवडणूक आयोगाच्या ‘एसव्हीईईपी’ उपक्रमांतर्गत (सिस्टेमॅटिक व्होटर एज्युकेशन अ‍ॅन्ड इलेक्ट्रोरल पार्टिसिपेशन) हा ‘व्हिडीओ गेम’ बनविण्यात आला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर हा ‘गेम’ उपलब्ध असून त्याला संगणकावर ‘डाऊनलोड’ करण्याची सोयदेखील यामध्ये आहे.
‘कॉमिक्स’ , ‘रेडिओ’
व आता ‘गेम’
निवडणूक आयोगाने मतदार जागृतीसाठी याअगोदर निरनिराळी पावले उचलली आहेत. केवळ मतदार व नवमतदारच नाही तर अगदी शाळकरी विद्यार्थ्यांसाठीदेखील ‘कॉमिक्स’, ‘पिक्चर बुक्स’, ‘रेडिओ’ इत्यादींच्या माध्यमातून आयोगाने पुढाकार घेतला. ‘प्राऊड टू बी व्होटर’, ‘गर्व से बने मतदाता’ नावाची ‘पिक्चर बुक्स’, ‘रेडी! स्टेडी! व्होट!’ आणि ‘व्होट की बाजी’ नावाचे ‘बोर्ड गेम’ व ‘लोकतंत्र एक्सप्रेस’ नावाचा ‘रेडिओ’ कार्यक्रम यांचा यात समावेश आहे.(प्रतिनिधी)
कसा आहे
‘गेट! सेट! व्होट!’?
‘गेट सेट व्होट’ नावाचा हा ‘व्हिडिओ गेम’ जास्तीत जास्त रोचक व संवादात्मक करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यात एकूण १० ‘लेव्हल’ असून प्रत्येक टप्प्यानंतर मतदान तसेच लोकशाही प्रणालीबद्दल अतिशय चांगली व उपयोगी माहिती व तथ्य समोर येतात. प्रत्येक ‘लेव्हल’ सोबत गेममधील आव्हाने आणखी वाढत जातात व समोर येणारी माहिती जास्तीत जास्त सखोल होत जाते. यात भारतीय लोकशाही प्रणाली, मतदान कसे करावे, मतदार नोंदणी, नैतिक मतदान, निवडणूक आयोगाकडून मदत इत्यादी बाबींचा समावेश आहे. हा ‘गेम’ खेळल्यानंतर मतदानासंदर्भातील प्रश्नांची उत्तरे मतदाराला आपोआप मिळतात आणि म्हणूनच याचे नाव ‘गेट सेट व्होट’ असे ठेवण्यात आले आहे.

Web Title: 'Gate' from 'Video Game' Set! Vote! '

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.