दिवाळीनिमित्त चिवडा बनवताना गॅसचा भडका उडाला; मुलाचा मृत्यू तर आजी गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2021 10:18 PM2021-11-01T22:18:18+5:302021-11-01T22:18:50+5:30

Nagpur News सदर पोलिसांच्या हद्दीतील सेमिनरी हिल्स परिसरातील बांधकाम विभागाच्या क्वॉर्टरमध्ये सिलिंडरच्या गॅसचा भडका उडाल्याने कुलदीप राजपूत (१२) भाजल्याने त्याचा मृत्यू झाला, तर त्याची आजी सुषमा कश्यप (६०) या गंभीर जखमी झाल्या.

Gas exploded while making Chiwda for Diwali; The death of the child is serious | दिवाळीनिमित्त चिवडा बनवताना गॅसचा भडका उडाला; मुलाचा मृत्यू तर आजी गंभीर

दिवाळीनिमित्त चिवडा बनवताना गॅसचा भडका उडाला; मुलाचा मृत्यू तर आजी गंभीर

googlenewsNext
ठळक मुद्देसेमिनरी हिल्स परिसरातील घटना

नागपूर : सदर पोलिसांच्या हद्दीतील सेमिनरी हिल्स परिसरातील बांधकाम विभागाच्या क्वॉर्टरमध्ये सिलिंडरच्या गॅसचा भडका उडाल्याने कुलदीप राजपूत (१२) भाजल्याने त्याचा मृत्यू झाला, तर त्याची आजी सुषमा कश्यप (६०) या गंभीर जखमी झाल्या. सोमवारी दुपारी १.३० वाजेच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, दिवाळीनिमित्त क्वॉर्टर क्र. १८ येथील रहिवासी कुलदीप याची आजी सुषमा कश्यप व मामी आराधना कश्यप शेगडी खाली ठेवून दिवाळीनिमित्त चिवडा तयार करत होते. त्यावेळी कुलदीप शेगडीजवळ बसला होता. काही वेळाने आराधना आपल्या मुलाला घेऊन बाधरूममध्ये गेली. त्यावेळी कुलदीपने सिलिंडरच्या रेग्युलेटरचा पाईप ओढण्याला सुरुवात केली. यामुळे रेग्युलेटरचा पाइप निघताच आगीने भडका घेतला. यात कुलदीप भाजला. त्याच्या आजीने आग विझविण्याचा प्रयत्न केला. यात तिचे हात भाजले.

घटनेची माहिती मिळताच पोलीस व अग्निशमन विभागाची गाडी घटनास्थळी पोहोचली. सदर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनोद चौधरी, उपनिरीक्षक गुरुनुले, मोटे व प्रमोद दिघोरे घटनास्थळी पोहोचले. जखमींना उपचारासाठी पाठविले. डॉक्टरांनी तपासणी करून कुलदीपला मृत घोषित केले.

अन् आई-मुलाची भेट झालीच नाही

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कुलदीपची आई रायपूर येथे राहते. मागील दोन वर्षांपासून कुलदीप आजी व मामाकडे राहत होता. तो सातव्या वर्गात शिकत होता. बुधवारी त्याची आई मुलाच्या भेटीसाठी येणार होती; परंतु, भेटीपूर्वीच मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला.

Web Title: Gas exploded while making Chiwda for Diwali; The death of the child is serious

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.