शहरं
Join us  
Trending Stories
1
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
2
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
3
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
4
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
5
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
6
७० वर्षांत काहीच झाले नाही, मग १० वर्षे तुम्ही काय केले; प्रियंका गांधींचा PM मोदींना सवाल
7
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
8
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
9
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
10
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
11
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
12
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
13
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
14
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
15
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
16
हृदयद्रावक! ६ महिन्यांचा लेक पोरका झाला; भारतमातेच्या हुतात्मा सुपुत्राला अखेरचा निरोप
17
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
18
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...
19
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
20
इंटिमेट सीन्समुळे अनेक चित्रपट गमावले, आईवडिलांची नव्हती परवानगी; मृणाल ठाकुरचा खुलासा

नागपुरात कचराकुंड्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2019 11:14 PM

शहर स्वच्छ व सुंदर असावे, स्वच्छ शहराच्या यादीत अव्वल क्रमांक यावा, यासाठी महापालिका प्रशासनाने शहरातील अनेक रस्त्यांच्या बाजूला प्लास्टिकच्या कचराकुंड्या (डबे) लावल्या. ओला व सुका कचरा वेगवेगळा संकलित व्हावा, यासाठी दोन कचराकुंड्या ठेवण्यात आल्या. काही महिन्यातच या कचराकुंड्यांची अवस्था दयनीय झाली. अनेक ठिकाणच्या कचराकुंड्या चोरीला गेल्या तर काही ठिकाणी कचऱ्यांच्या ढिगाऱ्यात पडून आहेत. यावरील लाखो रुपयांचा खर्च पाण्यात गेला आहे. अशा परिस्थितीत नागपूर स्वच्छ सर्वेक्षणात अव्वल कसे येणार, असा प्रश्न शहरातील नागरिकांना पडला आहे.

ठळक मुद्देस्वच्छता सर्वेक्षणात अव्वल कसे येणार : कचराकुंड्यांवरील खर्च पाण्यात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहर स्वच्छ व सुंदर असावे, स्वच्छ शहराच्या यादीत अव्वल क्रमांक यावा, यासाठी महापालिका प्रशासनाने शहरातील अनेक रस्त्यांच्या बाजूला प्लास्टिकच्या कचराकुंड्या (डबे) लावल्या. ओला व सुका कचरा वेगवेगळा संकलित व्हावा, यासाठी दोन कचराकुंड्या ठेवण्यात आल्या. काही महिन्यातच या कचराकुंड्यांची अवस्था दयनीय झाली. अनेक ठिकाणच्या कचराकुंड्या चोरीला गेल्या तर काही ठिकाणी कचऱ्यांच्या ढिगाऱ्यात पडून आहेत. यावरील लाखो रुपयांचा खर्च पाण्यात गेला आहे. अशा परिस्थितीत नागपूर स्वच्छ सर्वेक्षणात अव्वल कसे येणार, असा प्रश्न शहरातील नागरिकांना पडला आहे.प्रतापनगर भागातील गिट्टीखदान ले-आऊ ट येथे कचऱ्याच्या ढिगाऱ्यात गेल्या काही दिवसापासून कचराकुंड्या पडून आहेत. काही कुंड्या कचरा वेचणाºयांनी तोडून भंगारवाल्यांना विकल्याची माहिती आहे. ओला आणि सुका कचरा वेगवेगळा संकलित व्हावा यासाठी घरोघरी हिरव्या आणि निळ्या रंगाच्या दोन डस्टबिन वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र हा निर्णय कायद्याच्या चौकटीत अडल्याने त्याची अंमलबजावणी झाली नाही. त्यानंतर महापालिकेच्या आरोग्य विभागाने शहरातील काही प्रमुख रस्त्यांच्या कडेला कचराकुंडया लावल्या. परंतु यातील कचरा उचलला जात नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी येऊ लागल्या. तक्रार आली तर कचरा उचलला जातो नाही तर कचराकुंड्या कचऱ्याने भरलेल्या राहतात. यामुळे ये-जा करणाऱ्यांना तसेच बाजूला राहणाऱ्या लोकांना दुर्गंधीचा त्रास होतो.केंद्र शासनाच्या स्वच्छ शहरांच्या सर्वेक्षणात नागपूर शहराचा क्रमांक ५३ वरून ५५ व्या स्थानावर गेला आहे. तो तसा जाण्याला या कुंड्यांचाही थोडाफार हातभार आहे. शहरातील विविध भागात अशा १७०० कचराकुंडया लावण्यात आल्या. मात्र, गेल्या वर्षभरात त्यातील अनेक डबे तुटून पडले आहेत, तर काही चोरीला गेले. शहरातील अनेक भागात घराघरातून कचरा उचलला जात असल्याचा दावा केला जात असला तरी वास्तविकता तशी नाही. आजही अनेकांच्या घरी कचरा उचलायला कुणीच जात नाही. प्रभागातीलच एका भागात कचरा साठवून ठेवला जातो.

 

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाGarbage Disposal Issueकचरा प्रश्न