नागपुरातील मानकापुरात कचरा वेचणाऱ्याची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 01:06 IST2018-03-06T01:06:34+5:302018-03-06T01:06:54+5:30

सोबत राहून कचरा वेचणाऱ्या  दोघांमध्ये क्षुल्लक कारणावरून वाद झाल्यानंतर एकाने दुसऱ्याची गळा कापून हत्या केली. मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोरेवाडा रिंगरोड जवळच्या गंगानगर झोपडपट्टीत सोमवारी सायंकाळी ६ च्या सुमारास ही थरारक घटना घडली.

Garbage collecting man murdered at Manakpur in Nagpur | नागपुरातील मानकापुरात कचरा वेचणाऱ्याची हत्या

नागपुरातील मानकापुरात कचरा वेचणाऱ्याची हत्या

ठळक मुद्देक्षुल्लक कारणावरून घडली घटना

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सोबत राहून कचरा वेचणाऱ्या  दोघांमध्ये क्षुल्लक कारणावरून वाद झाल्यानंतर एकाने दुसऱ्याची गळा कापून हत्या केली. मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोरेवाडा रिंगरोड जवळच्या गंगानगर झोपडपट्टीत सोमवारी सायंकाळी ६ च्या सुमारास ही थरारक घटना घडली. मृताचे नाव गुड्डू आहे.
आरोपीचे नाव गौरीनाथ पछेरे (वय ४०) असून, तो गंगानगर झोपडपट्टीत राहतो. गुड्डू आणि पछेरे दोघेही सोबत राहत होते. दोघेही अविवाहित असून, रोज दिवसभर कचरा वेचणे, तो विकून आलेल्या पैशातून दारू पिणे आणि राहणे, असा त्यांचा दिनक्रम होता. सोमवारी नेहमीप्रमाणे कचरा विकून त्यांनी सोबतच दारू पिली. त्यानंतर ते सायंकाळी ५ च्या सुमारास झोपडीसमोर बसले. क्षुल्लक कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. गुड्डूने पछेरेला अश्लील शिवीगाळ केली. त्यामुळे आरोपी पछेरे घरात गेला आणि त्याने धारदार चाकू आणून गुड्डूचा गळा चिरला. अनेकांसमोर हे थरारक हत्याकांड घडले. त्यांच्यातील एकाने पोलिसांना कळविले. मानकापूर पोलिसांनी घटनास्थळी पोहचून गुड्डूला मेयोत नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणाची सविस्तर माहिती पोलिसांकडून वृत्त लिहिस्तोवर उपलब्ध होऊ शकली नाही.

 

Web Title: Garbage collecting man murdered at Manakpur in Nagpur