शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
4
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
5
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
6
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
7
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
8
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
9
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
10
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
11
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
12
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
13
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
14
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
15
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
16
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
17
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
18
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
19
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
20
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
Daily Top 2Weekly Top 5

Vidhan Sabha Election 2019; निवडणूक रिंगणात नेत्यांचाही रंगणार गरबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2019 11:29 IST

जनसंपर्कासाठी मिळालेल्या या काळाचा अधिकाधिक फायदा कसा करून घ्यायचा, या नियोजनात गुंतलेले संभाव्य उमेदवार फेस्टिव्हल कनेक्टचा फंडा वापरत असल्याचे दिसत आहे.

ठळक मुद्देउमेदवारांचे ‘फे स्टिव्हल क नेक्ट’नवरात्रोत्सवातील असाही फंडा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : निवडणुका आल्या की उमेदवारांना मतदारांविषयी भारीच प्रेम उफाळून येते. त्यातल्यात्यात संस्था, कॉलनी, संघटित युवा मंडळ, क्रिकेटसारखे क्लब, सण-उत्सवात तर आलेल्या प्रेमाचे भरते काही विचारू च नका! विधानसभा निवडणुक ांच्या तारखा घोषित झाल्या आहेत. मोजून महिनाभराने निवडणुका आहेत. जनसंपर्कासाठी मिळालेल्या या काळाचा अधिकाधिक फायदा कसा करून घ्यायचा, या नियोजनात गुंतलेले संभाव्य उमेदवार फेस्टिव्हल कनेक्टचा फंडा वापरत असल्याचे दिसत आहे.सध्या मस्कऱ्या गणपतीचे दिवस सुरू आहेत. देवापुढे कधी हात न जोडणारेही आता मस्कºया गणपतीच्या मंडपात जाऊन कार्यकर्त्यांना काय हवं-नको विचारत आहेत. पुढच्या आठवड्यातच नवरात्रोत्सव सुरू होत आहे. एरवी असे सण-उत्सवांचे दिवस आले की हीच नेतेमंडळी फ्लॅक्स-होर्डिंगवर दणदणीत शुभेच्छा देऊन मोकळी होत असत. आता आचारसंहिता लागल्याने बॅनर जप्त होण्याची शक्यता असल्याने गावागावातील, कॉलनीतील महिला मंडळे, महिला बचत गटांसोबत नेत्यांचा संपर्क वाढायला लागला आहे. नेत्यांच्या कुटुंबातील महिलावर्गही खेड्यापाड्यात पोहचून महिलांसोबत संपर्क वाढविताना दिसत आहे.नागपुरात अद्याप कुण्या पक्षाकडून अधिकृत उमेदवार जाहीर झालेले नाहीत. तिकिटासाठी स्पर्धा एवढी आहे की आपल्यालाच तिकीट मिळेल, याचीही कुणाला हमी नाही. तरीही उद्या अडचण नको म्हणून मैदानातील सरावासाठी सारेच उतरले आहेत. अद्याप तिकीट हाती आले नसले तरी संभाव्य उमेदवारांनी प्रचाराची ‘ब्ल्यूप्रिंट’ तयार क रून ठेवली आहे. पारंपरिक तसेच ‘हायटेक’ प्रचारासोबतच पुढील महिनाभरात येणाºया सणांच्या माध्यमातून मतदारांशी ‘कनेक्ट’ कसे होता येईल, यावर सर्वांचा भर दिसत आहे.तसेही अनेक जण गणेशोत्सवापासूनच ‘आॅफ द रेकॉर्ड’ प्रचाराला लागले आहेत. पोस्टर्स, बॅनर्सच्या माध्यमातून अनेक उमेदवार नागपुरातील चौक ाचौकात झळकले आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे इच्छुक उमेदवारांमध्ये यासाठी अहमहिका एवढी की एकाच पक्षातील दोन-तीन उमेदवारांच्या छब्या दिसायला लागल्याने मतदारही गंमत अनुभवत आहेत.ऐन पितृपक्षात आचारसंहिता लागल्याने दोन दिवसानंतरही अद्याप निवडणुकीची हवा सुरू झालेली नाही. मात्र तिकीट मिळालेच तर, मोठ्या मंडळांच्या माध्यमातून नवरात्रोत्सवाच्या काळात मैदान कसे गाजवायचे आणि जनसंपर्काचा लाभ कसा उठवायचा, याचे प्लॅनिंग सर्वांनीच करून ठेवले आहे. सार्वजनिक दुर्गा-शारदा उत्सव मंडळे तसेच रास-गरबा व दांडियाचे माध्यम यासाठी महत्त्वाचे असल्याने सर्वांचा या नियोजनावर डोळा दिसत आहे.या माध्यमातून मतदारांसोबत ‘सोशल कनेक्ट’ होण्यासाठी अनेक संभाव्य उमेदवारांनी आपली टीम तयार के ली असून जबाबदारीदेखील सोपविली आहे. ऐन प्रचाराच्या धामधुमीतच विजयादशी आणि धम्मचक्र प्रवर्तन दिन येत असल्याने हा इव्हेंट कोणत्याही परिस्थितीत सोडायचा नाही, यासाठी सर्वांचे जोरदार नियोजन दिसत आहे.शहरातील सहाही मतदारसंघात निवडणूक प्रचाराचा रंग दिसून येणार आहे. सार्वजनिक दुर्गा उत्सव मंडळात उत्साह दिसून येत आहे. निवडणुकांमुळे नेत्यांचा उत्साह वाढल्याने भक्तगणही उत्साहात दिसत आहेत. संभाव्य उमेदवारांकडून यंदा किती वर्गणी घ्यायची, यावर मंडळाचे पदाधिकारी विचारमंथन करीत आहेत तर, कोणत्या मंडळाची ताकद किती, याचा अंदाज इच्छुक उमेदवार घेत आहेत. अंदाज आल्यावर अनेक ठिक ाणी तर पक्षाशी संबंधित उद्योजकांडून मोठ्या ‘स्पॉन्सरशिप’संदर्भात बोलणी सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्याचीही माहिती आहे. या सर्व हालचालींच्या पार्श्वभूमीवर यंदाचा नवरात्रोत्सव दणक्यात पार पडणार, असे दिसत आहे. नवरात्रोत्सवातील दांडियासोबत नेत्यांचाही गरबा निवडणुकीच्या रिंगणात रंगणार आहे.

टॅग्स :Assembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019