गांजा तस्कर निघाला बलात्काराचा आरोपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2018 00:24 IST2018-06-03T00:24:01+5:302018-06-03T00:24:17+5:30

गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने मोमिनपुऱ्यातील गांजा तस्कर आरोपी शेख सलाम शेख कलाम (वय २७) याला अटक केली. त्याच्याकडून १० किलो गांजा जप्त करण्यात आला.

Ganja smuggler turned rape accused | गांजा तस्कर निघाला बलात्काराचा आरोपी

गांजा तस्कर निघाला बलात्काराचा आरोपी

ठळक मुद्दे१० किलो गांजा जप्त

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने मोमिनपुऱ्यातील गांजा तस्कर आरोपी शेख सलाम शेख कलाम (वय २७) याला अटक केली. त्याच्याकडून १० किलो गांजा जप्त करण्यात आला.
शुक्रवारी रात्री ९ च्या सुमारास सलाम गांजाची खेप घेऊन राणी दुर्गावती चौकात येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यावरून वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र निकम यांच्या नेतृत्वातील पोलीस पथकाने राणी दुर्गावती चौकात सापळा लावला. सलाम नजरेस पडताच त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याजवळ १० किलो २२४ ग्राम गांजा तसेच मोबाईल आढळला. पोलिसांनी तो जप्त केला. आणखी एक गांजा तस्कर भंडाऱ्याकडे पळाल्याचे कळाल्याने पोलिसांचे पथक त्याला ताब्यात घेण्यासाठी रवाना झाले. सहायक पोलीस निरीक्षक डी. एम. चंदन, उपनिरीक्षक स्वप्निल वाघ, हवालदार दत्ता बागुल, विठोबा काळे, नायक तुलसी शुक्ला यांनी ही कामगिरी बजावली.
आरोपी शेख सलाम शेख कलाम हा कुख्यात गुन्हेगार आहे. तो जरीपटक्यातील बलात्कार आणि अनैसर्गिक कृत्याच्या गुन्ह्यातील आरोपी आहे. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर तो तीन आठवड्यांपासून फरार होता. गांजा तस्करीच्या चौकशीनंतर त्याला जरीपटका पोलीस बलात्काराच्या गुन्ह्यात अटक करणार आहेत.

Web Title: Ganja smuggler turned rape accused