शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक! नेपाळ्यांचा भारतीय सीमेत घुसून हल्ला; वनविभागाच्या पाच चौक्या जाळल्या
2
उद्याची सकाळ दरवाढीच्या झटक्यांची; टोलनंतर आता अमूलचे दूध २ रुपयांनी महागले
3
लोकसभेचे मतदान संपताच टोल दरात मोठी वाढ; आज मध्यरात्रीपासून लागू करण्याचे आदेश
4
जगन मोहन रेड्डींची खुर्ची धोक्यात; आंध्र प्रदेशच्या एक्झिट पोलनुसार भाजपा सत्तेत येण्याची दाट शक्यता
5
महत्वाचा अलर्ट! आयकर विभागाची L&T वर कारवाई; उद्या शेअर बाजारावर परिणाम होण्याची शक्यता 
6
"होय, मला भारताचा कोच व्हायला आवडेल, यापेक्षा मोठा...", गौतम गंभीरनं सोडलं मौन
7
ओडिशा विधानसभेत BJP आणि BJD यांच्यात टाय; दोन्ही पक्षांना 62-80 जागा मिळण्याची शक्यता
8
'देश वाचवण्यासाठी पुन्हा तुरुंगात जातोय; Exit Poll वर विश्वास ठेवू नका'- अरविंद केजरीवाल
9
एक्झिट पोल जाहीर होताच भाजपात गेलेल्या आप आमदाराने राजीनामा मागे घेतला
10
"संघाच्या शाखेत जाऊनही मी डाव्या विचारसरणीचा कारण...", आशुतोष गोखलेने मांडले राजकीय विचार
11
"एक्झिट पोलमध्ये अटलजी, पण पंतप्रधान बनले मनमोहन सिंग", काँग्रेस नेत्याचा मोठा दावा
12
सिक्कीमध्ये सत्ताधारी SKM चा दणदणीत विजय; भाजपचे सर्व उमेदवार पराभूत
13
अदा शर्मा सुशांतसिंह राजपूतच्या फ्लॅटमध्ये झाली शिफ्ट, म्हणाली, "या घरात मला..."
14
एनडीए ३९७ पार! एक्झिट पोलनंतर लगेचच e-मतदानाचा निकाल आला; पहा महाराष्ट्रात काय परिस्थिती?
15
"निवडणुकीआधी उद्धव ठाकरेंनी मोदींकडे भेटीची वेळ मागितली होती", शिंदे गटातील नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
16
११ हजार कोटींच्या संपत्तीवरून वाद... आईने भावाला मारहाण केल्याचा ललित मोदींचा आरोप
17
आज ठाकरेंना नऊ जागा दाखवत असतील...; अजित पवार गटाला शून्य जागेवरून राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा मोठा दावा
18
"निकालानंतर २० दिवसातच उद्धव ठाकरे मोदींसोबत..."; आमदार रवी राणांचा मोठा गौप्यस्फोट
19
इलेक्शन ड्युटीवरील कर्मचाऱ्यांसाठी काळ बनला सूर्य; 58 जणांचा मृत्यू, सर्वाधिक 'या' राज्यात...
20
"ज्या शाळेत शिकलात ती काँग्रेसने बांधलीय"; नाना पटोलेंचा संजय राऊतांना खोचक टोला

गडचिरोलीच्या पोलीस उपनिरीक्षकावर बलात्काराचा गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2017 8:57 PM

 नागपूर - गावाकडच्या मैत्रीणीसोबत वर्षभर शरिरसंबंध प्रस्थापित केल्यानंतर तिला लग्नास नकार देणा-या पोलीस उपनिरीक्षकाचे (पीएसआय) भवितव्य धोक्यात आले आहे. शिवराज नागनाथ हाडे (वय २८) नामक या पोलीस उपनिरीक्षकावर सीताबर्डी ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, त्याची कुणकुण लागताच तो फरार झाला आहे.हाडे गडचिरोली जिल्ह्यातील लाहेरी पोलीस ठाण्यात तैनात होता. तो मुळचा ...

 नागपूर - गावाकडच्या मैत्रीणीसोबत वर्षभर शरिरसंबंध प्रस्थापित केल्यानंतर तिला लग्नास नकार देणा-या पोलीस उपनिरीक्षकाचे (पीएसआय) भवितव्य धोक्यात आले आहे. शिवराज नागनाथ हाडे (वय २८) नामक या पोलीस उपनिरीक्षकावर सीताबर्डी ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, त्याची कुणकुण लागताच तो फरार झाला आहे.हाडे गडचिरोली जिल्ह्यातील लाहेरी पोलीस ठाण्यात तैनात होता. तो मुळचा नांदेड जिल्ह्यातील रहिवासी आहे. माहूर येथील तरुणी (वय २७) वर्षभरापूर्वी फेसबूकच्या माध्यमातून त्याच्या संपर्कात आली. ती स्पर्धा परिक्षेची तयारी करीत असून, अजनी परिसरात राहते. मैत्रीनंतर तास न तास आॅनलाईन चॅटिंग करून एकमेकांच्या संपर्कात राहणा-या या दोघांनी ३० डिसेंबर २०१६ रोजी नागपुरात प्रत्यक्ष भेटीचा निर्णय घेतला. तो गडचिरोलीहून सीताबर्डीत आला. येथे हल्दीरामसमोर त्यांची भेट झाली. त्यानंतर ते एका लॉजमध्ये गेले. तेथे त्यांनी शरिरसंबंध प्रस्थापित केले. त्यानंतर लग्नाच्या आणाभाका घेऊन ते नियमित एकमेकांना भेटू लागले. ३० आॅक्टोबर २०१७ पर्यंत सर्व काही व्यवस्थीत होते. अचानक त्याच्या वर्तनात बदल झाल्याचे जाणवल्यामुळे तिने चौकशी केली असता तो दुसरे लग्न करण्याच्या तयारीत असल्याचे तिला समजले. त्यामुळे तिने सरळ गडचिरोली गाठली. त्याला भेटून त्याच्यावर लग्नासाठी दबाव टाकला असता त्याने लग्नास नकार दिला. त्यामुळे आठवडाभरापूर्वी तिने गडचिरोली पोलिसांत हाडेविरोधात बलात्काराची तक्रार नोंदवली. प्रकरण नागपूरमध्ये झाल्याने गडचिरोली पोलिसांनी शून्यची क्राईमी करून प्रकरण तपासासाठी सीताबर्डी पोलिसांत पाठविले. हाडे कव्हरेज क्षेत्राबाहेरसीताबर्डीचे ठाणेदार हेमंत खराबे यांनी प्रकरणाचे गांभिर्य लक्षात घेत पोलीस उपनिरीक्षक किर्लेकर यांना तरुणीच्या तक्रारीवरून बलात्काराचा गुन्हा दाखल केला. दरम्यान, आपल्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याचे कळाल्यानंतर हाडेने त्याचा मोबाईल बंद केला अन् तो फरार झाला. त्याच्या मोबाईलवर पोलीस वारंवार संपर्क करीत असून, प्रत्येक वेळी ह्यहा क्रमांक कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर असल्याची केसेट ऐकत आहे. फरार हाडेचा पोलीस शोध घेत आहेत.

टॅग्स :crimeगुन्हेPoliceपोलिस