शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात टोळक्याची दहशत; महिलेला पायावर लोटांगण घालत मागायला लावली माफी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2024 09:00 IST

नागपुरात एका महिलेला लोटांगण घालून माफी मागण्यास पाडायला लावल्याने तिघांना अटक करण्यात आली आहे.

Nagpur Crime : नागपुरातून एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. पेट्रोल पंपावर किरकोळ वादातून टवाळखोरांच्या जमावाने पेट्रोल पंप चालक आणि एका महिलेला धक्काबुक्की आणि दमदाटी केली. एवढंच नाही तर महिलेला लोटांगण घालत माफी मागण्यास भाग पाडण्यात आलं. त्यानंतर दहशत पसरवण्यासाठी आरोपींनी या सगळ्या प्रकाराचा व्हिडीओ व्हायरल केला. पोलिसांनी या प्रकरणी तीन जणांना अटक केली असून पुढील तपास सुरु केला आहे.

नागपुरात एका महिलेला माफी मागण्यास भाग पाडल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर तिघांना अटक करण्यात आली. एका भटक्या कुत्र्याचा छळ केल्याने विकास बोरकर या महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप करण्यात आल्याचे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले.

ही घटना बुधवारी रात्री घडली. दोघांमध्ये वाद झाल्यानंतर विकास त्याच्या काही मित्रांसह परतला आणि महिलेला जमिनीवर झोपवून माफी मागण्यास भाग पाडले. ४४ वर्षीय महिलेच्या तक्रारीवरून बोरकर आणि त्याचे मित्र राजेश मिश्रा आणि पंकज भरेकर यांना अटक करण्यात आली, अशी माहिती पोलिसांनी दिली.

१८ डिसेंबर रोजी हा सगळा प्रकार घडल्याचे समोर आलं आहे. नागपूर हिंगणा रोड परिसरात असलेल्या इलेक्ट्रिक झोन परिसरातील पंपचालक महिलेला दोन तरुण पेट्रोल पंपावर विनाकारण फिरताना दिसले. त्यामुळे या महिलेने त्या दोन तरुणांना हटकले. त्यावरुनच तिघांमध्ये मोठा वाद झाला. त्यानंतर हे तरुण गुंडप्रवृत्तीच्या लोकांना पेट्रोल पंपावर घेऊन आले. त्यांनी रात्री १० च्या सुमारास पेट्रोल पंपावर गोंधळ घातला. या भागात  आमची दादागिरी चालते असे म्हणत गुंडांनी महिलेला माफी मागायला लावली. मात्र एवढ्यावर या तरुणांचे समाधान झालं नाही. जमावाचं नेतृत्व करणाऱ्या एका गुंडांने महिलेला पायावर लोटांगण घेत माफी मागायला लावली आणि या सगळ्या प्रकाराचा व्हिडीओ व्हायरल केला. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत तिघांना अटक केली आहे.

"सात आठ जण पेट्रोल पंपावर आले आणि त्यांनी मला माफी मागायला लावली. त्यानंतर माझा व्हिडीओ काढून तो सोशल मीडियावर व्हायरल केला. मी एकाचा मोबाईल धरुन ठेवला. मी याबाबत पोलिसांकडे तक्रार केली होती. त्यामुळे मला त्यांना गुंतवून ठेवायचे होते. त्यामुळे मी एकाचा मोबाईल हिसकावून घेतला. त्यामुळे तो काही करु नाही शकला," असं पीडित महिलेने सांगितले. 

टॅग्स :nagpurनागपूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस