नागपुरात  मूकबधिर तरुणीवर सामूहिक अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2019 22:03 IST2019-01-24T22:01:50+5:302019-01-24T22:03:35+5:30

मूकबधिर मुलीवर अत्याचार करणाऱ्या दोघांना रंगेहात पकडून संतप्त जमावाने त्यांची बेदम धुलाई केली. नंतर त्यांना नंदनवन पोलिसांच्या हवाली केले. बुधवारी दुपारी ४ वाजता घडलेल्या या प्रकारामुळे वाठोडा, नंदनवन परिसरात तणाव निर्माण झाला होता.

Gang rape on a deaf and dumb young girl in Nagpur | नागपुरात  मूकबधिर तरुणीवर सामूहिक अत्याचार

नागपुरात  मूकबधिर तरुणीवर सामूहिक अत्याचार

ठळक मुद्देरंगेहात सापडले दोन आरोपी : जमावाकडून बेदम धुलाई

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मूकबधिर मुलीवर अत्याचार करणाऱ्या दोघांना रंगेहात पकडून संतप्त जमावाने त्यांची बेदम धुलाई केली. नंतर त्यांना नंदनवन पोलिसांच्या हवाली केले. बुधवारी दुपारी ४ वाजता घडलेल्या या प्रकारामुळे वाठोडा, नंदनवन परिसरात तणाव निर्माण झाला होता.
पीडित मुलगी १४ वर्षांची आहे. तिच्या परिवाराची आर्थिक अवस्था बेताची आहे. चरितार्थ चालविण्यासाठी आईवडील गावोगावी जातात. मुलगी सध्या काकांच्या आश्रयाला आहे. बुधवारी काकांकडे पाहुणे आल्यामुळे त्यांना घेऊन ते नंदनवनमध्येच राहणाऱ्या  दुसऱ्या  नातेवाईकांकडे गेले होते. दुपारी ४ ला परत आले तेव्हा त्यांना त्यांची पुतणी घरी दिसली नाही. ती बराच वेळेपासून घराबाहेर असल्याचे ध्यानात आल्यामुळे त्यांनी शेजारी चौकशी केली असता वस्तीत राहणारा आरोपी विनोद नरसिंग तांडी (वय १९) याच्या घरात असल्याचे एकाने सांगितले. त्यानुसार काका तांडीच्या घरी गेले. तेथे बाहेरच्या खोलीत शुभम ऊर्फ रितिक श्रीराम गंगाभोईर (वय १८, रा. वाठोडा) हा बसून दिसला. काकाने त्याला पीडित मुलीबाबत विचारणा केली तेव्हा आरोपी तांडी आतल्या खोलीतून नको त्या अवस्थेत बाहेर येताना दिसला. ते पाहून काकांनी पीडितेला आवाज दिला असता ती पण तशाच अवस्थेत बाहेर आली. तिने सांकेतिक भाषेत आरोपी तांडीने अत्याचार केल्याचे काकांना सांगितले. त्यामुळे काकांनी शेजाऱ्यांना गोळा करून हा प्रकार सांगितला. त्यामुळे संतप्त शेजाऱ्यांनी आरोपी तांडी आणि गंगाभोईर या दोघांचीही बेदम धुलाई केली. त्यानंतर त्यांना नंदनवन पोलिसांच्या हवाली केले. पोलिसांनी आरोपींना अटक केली.
अनेकदा केला अत्याचार
मुलीचे पालक अनेकदा दिवसा घरी नसतात. ती संधी साधून आरोपी तिला नेहमी आपल्या घरात न्यायचे आणि तिच्यावर अत्याचार करायचे, अशी माहिती आता पुढे आली आहे. मुलगी मूकबधिर असल्याने आरोपीचे पाप आतापर्यंत उघड झाले नव्हते. बुधवारी दुपारी ते रंगेहातच पकडले गेले. त्यामुळे त्यांचे पाप चव्हाट्यावर आले आहे.

 

Web Title: Gang rape on a deaf and dumb young girl in Nagpur