शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
"मी विरोध केला नाही, 'त्या' पोझिशनमध्ये केवळ छताकडे बघत राहिले अन् डोनाल्ड ट्रम्प..."; पॉर्न स्टारचे खळबळजनक खुलासे
5
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
6
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
7
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
8
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
9
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
10
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
11
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

नागपुरात टोळीने हडपले कोट्यवधी रुपये; एमबीबीएसला अ‍ॅडमिशनची बतावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 11:15 AM

केंद्र सरकारच्या खास कोट्यातून एमबीबीएसला अ‍ॅडमिशन करून देतो, अशी बतावणी करून डॉक्टर बनण्याचे स्वप्न रंगविणाऱ्या विविध राज्यातील शेकडो जणांना एका टोळीने कोट्यवधी रुपयांचा गंडा घातला आहे.

ठळक मुद्देडॉक्टर बनण्याच्या स्वप्नासह घामाच्या मिळकतीचाही चुराडा

नरेश डोंगरे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्र सरकारच्या खास कोट्यातून एमबीबीएसला अ‍ॅडमिशन करून देतो, अशी बतावणी करून डॉक्टर बनण्याचे स्वप्न रंगविणाऱ्या विविध राज्यातील शेकडो जणांना एका टोळीने कोट्यवधी रुपयांचा गंडा घातला आहे. कुणाच्या पालकाकडून १० तर कुणाकडून ३५ लाखांपर्यंतची रक्कम उकळणाऱ्या या टोळीचे नेटवर्क नागपूर, सोलापूर, मुंबई, दिल्ली, अजमेर, जयपूरसह विविध शहरात आहे. सौरभ श्रीवास्तव (वय ३८, रा. सेक्टर ५०, गुडगाव, हरियाणा), सचिन उत्तलकर (वय ३०, रा. खारघर, सेक्टर २१, नवी मुंबई), शंकर मानवटकर (वय ३०, रा. रिलायन्स फ्र्रेशजवळ, अथर्वनगर, बेसा), उल्हास सेवारे (वय ३०) अशी या टोळीतील आरोपींची नावे आहेत. तर, प्रमोद आणि प्रभाकर नामक दोन पात्रही या टोळीत महत्त्वाची भूमिका वठवितात.मार्च-एप्रिल दरम्यान ही टोळी मोठ्या शहरातील बस, रेल्वेस्थानक आणि वर्दळीच्या ठिकाणी पोस्टर, पॉम्प्लेट चिकटवतात. एमबीबीएसच्या प्रवेशासाठी विशेष मार्गदर्शन आणि हमखास यशाची हमी देण्याचा दावा त्यात असतो. डॉक्टर बनण्याचे स्वप्न रंगविणारे विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांच्या वाचनात हे पोस्टर, पॉम्प्लेट गेल्यास ते त्यातील नमूद क्रमांकावर संपर्क करतात. या टोळीतील सदस्य त्यांना मध्यवर्ती ठिकाणावर बोलवतात. लोकमतच्या हाती आलेल्या पुराव्यानुसार, या टोळीने एप्रिल २०१७ मध्ये वर्धा, अमरावती, आकोट, अकोला, जालना, परभणी, सोलापूर, औरंगाबादसह राज्यातील ठिकठिकाणच्या विद्यार्थ्यांच्या पालकांना नागपूरच्या शांतिनगर हॉटेलमध्ये बोलवून घेतले होते. येथे या पालकांना थेट शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसच्या अ‍ॅडमिशनचे स्वप्न दाखवण्यात आले. विद्यार्थ्यांना कमी मार्कस् असतील तर केंद्र सरकारच्या कोट्यातून (सीपी कोटा) काम जमवून देण्याचीही उपरोक्त आरोपींनी बतावणी केली. पालक तयार होताच त्यांच्या पाल्याची शैक्षणिक कागदपत्रे मागवून घेण्यात आली. त्यानंतर त्यांना अ‍ॅडमिशन होऊ शकते, अशा आशयाचे एसएमएस पाठवून पालकांना एप्रिल-मे दरम्यान दिल्लीला एका पॉश हॉटेलमध्ये बोलविले. तेथे कुणाला १० लाख, कुणाला १५, २५ तर कुणाला चक्क ३५ लाखांपर्यंतची रक्कम (अ‍ॅडमिशन फी) सांगण्यात आली. ही रक्कम घेतानाच पालकांना खात्री पटावी म्हणून ठगबाजांनी त्यांना तेवढ्या रकमेचे पोस्ट डेटेड चेकही दिले. रक्कम घेतल्यानंतर त्यांच्याकडून १०० रुपयांच्या बॉन्ड पेपरवर सह्या घेण्यात आल्या आणि त्यांना जून २०१७ मध्ये महाराष्ट्र, छत्तीसगड, दिल्ली, राजस्थानमधील वेगवेगळ्या शासकीय मेडिकल कॉलेजमध्ये अ‍ॅडमिशन झाल्याचे पत्र देण्यात आले. त्यावर राजमुद्रेचा गैरवापर करून आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा यांच्या नावाची बनावट स्वाक्षरी केलेली आहे.

असा झाला भंडाफोडअमरावतीचे कंत्राटदार शेख मकसूद जुम्मामियां यांच्या मुलीची अ‍ॅडमिशन सोलापूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात झाल्याचे पत्र देण्यात आले होते. त्यानुसार, शेख मकसूद आपल्या मुलीला घेऊन २६ जून २०१७ ला सोलापूरला पोहचले. त्यांनी तेथे मुलीच्या अ‍ॅडमिशनचा प्रयत्न केला असता त्यांना मिळालेले पत्र बनावट असल्याचे आणि अ‍ॅडमिशन प्रक्रिया संपल्याचेही सोलापूर प्रशासनाने शेख मकसूद यांना सांगितले. हा प्रकार मकसूद यांनी आरोपी सचिन तसेच मानवटकरला सांगितला. यावेळी त्यांनी आमचे दिल्लीला डॉक्टर असून, त्यांच्याकडून मुलीसाठी वैद्यकीय प्रमाणपत्र देतो, त्या प्रमाणपत्राच्या आधारे विलंब झाला तरी अ‍ॅडमिशन होऊ शकते, अशी थाप मारली. तर, या क्षेत्रातील मंडळींनी असे शक्यच नसल्याचे ठासून सांगितल्याने मकसूद यांनी आरोपींना आपली रक्कम परत मागितली. आरोपींनी त्यांना १० पैकी ३ लाख परत केले. उर्वरित सात लाखांची रक्कम परत देण्यासाठी सहा महिने झुलविले. आरोपींनी केवळ अमरावतीच्या मकसूद यांनाच नव्हे तर वर्धा, अमरावती, आकोट, अकोला, जालना, परभणी, सोलापूर, औरंगाबादसह राज्यातील ठिकठिकाणच्या विद्यार्थ्यांच्या पालकांना गंडा घातला आहे.श्रीवास्तव बाऊ न्सरच्या गराड्यात, प्रमोद आणि प्रभाकर अंधारातया टोळीचा सूत्रधार सौरभ श्रीवास्तव असून, तो नेहमी बाऊन्सरच्या गराड्यात वावरतो तर, या टोळीतील प्रमोद आणि प्रभाकर नामक बॉस नेहमी अंधारात असतात. ते केवळ फोनवरच बोलतात. प्रत्यक्षात कधीही समोर येत नाहीत. आरोपी सचिन याने नवी मुंबईतील खारघर परिसरासत ‘भारतीय उच्च माध्यमिक शिक्षा परिषद भारत‘‘या नावाने एका आलिशान इमारतीत आॅफिस थाटले आहे. 

टॅग्स :Crimeगुन्हा