शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

अध्यक्षांच्या ३५ कोटींच्या माफीसाठी गॅमनचा आटापिटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2018 12:17 IST

कायद्यातील पळवाट शोधून मोठी कंपनीसुद्धा भागधारकांची कशी फसवणूक करते असते, हे मुंबईच्या गॅमन इंडिया लिमिटेडच्या प्रकरणातून समोर आले आहे.

ठळक मुद्देएका संचालकास ६० लाख माफ करणार?नीरव मोदी एवढाच मोठा घोटाळाउद्या वाचा : गॅमन इंडियाने ६ विदेशी उपकंपन्यांद्वारे हजारो कोटी रुपये बाहेर पाठवले का?

सोपान पांढरीपांडे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कायद्यातील पळवाट शोधून मोठी कंपनीसुद्धा भागधारकांची कशी फसवणूक करते असते, हे मुंबईच्या गॅमन इंडिया लिमिटेडच्या प्रकरणातून समोर आले आहे.२०१६-१७ मध्ये १६०० कोटी रुपयांचा तोटा झालेली ही कंपनी स्वत:चेच अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अभिषेक राजन यांना मानधनापोटी दिलेले ३५ कोटी रुपये माफ करण्यासाठी आटोकाट प्रयत्न करीत आहे. सकृद्ददर्शनी ही रक्कम क्षुल्लक वाटते. मात्र गॅमन इंडियाचा व्यावसाय अनेक देशांमध्ये आहे. या व्यावसायाचा आवाका बघता पैशांचा गैरव्यवहार कितीतरी अधिक मोठा असू शकतो, असे ‘लोकमत’ जवळील दस्तावेजांवरुन दिसून येते. गॅमन इंडियाच्या २०१६-१७ च्या वार्षिक अहवालानुसार, कंपनीने अध्यक्ष अभिषेक राजन यांना १ एप्रिल २०१२ ते १६ मे २०१६ या कालावधीत ३०.५४ कोटी रुपये अतिरिक्त मानधन दिले. याखेरीज गॅमन इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड (जीआयपीएल) या उपकंपनीनेही अभिषेक राजन यांना ३.८८ कोटी रुपये अतिरिक्त मानधन दिले. अशाप्रकारे अध्यक्ष राजन यांना ३४.४२ कोटी रुपये मानधन अतिरिक्त देण्यात आले. याचप्रकारे संचालक हिमांशू पारिख यांनाही ५९.८५ लाख रुपये अतिरिक्त मानधन देण्यात आले. पारिख यांनी २०१३ साली पदाचा राजीनामा दिला आहे. या प्रकरणी ‘लोकमत’ ने गॅमन इंडियाला ई-मेलही केला. पण ई-मेलमधील प्रश्नांनेही कंपनीकडून उत्तर देण्यात आलेले नाही. नटवरलाल वेपारी अ‍ॅण्ड कंपनीचे चार्टर्ड अकाउंटंट भागीदार एन. जयेंद्रन (यांची सही अहवालावर आहे) विदेशात असल्याने संपर्क होऊ शकला नाही.गॅमन इंडिया काय आहे?गॅमन इंडिया लिमिटेडची स्थापना १९२२ साली जॉन सी. गॅमन या ब्रिटिश इंजिनिअरने केली आहे. ही जगातील एक मोठी बांधकाम कंत्राटदार कंपनी आहे. अनेक देशात गॅमन इंडियाने इमारती, समुद्री पुल, रस्ते, विमानतळ, इत्यादींचे बांधकाम केले आहे.गॅमन इंडियाच्या ६ उपकंपन्या विदेशात असून भारतीय उपकंपन्या, संयुक्त उपक्रम कंपन्या, विशेष कंपन्या अशा ८० ते ८५ कंपन्या गॅमन इंडियाच्या छत्रछायेत काम करतात. गॅमन समूहाची २०१६ ची उलाढाल ८०७२ कोटी रुपये होती. पण २०१७ चा कंपनीचा व्यावसाय आश्चर्यकारकरित्या १७८८ कोटी रुपयांपर्यंत घसरला. यामुळे उलाढालीपेक्षा घोटाळ्याची रक्कमच मोठी असल्याचे दिसून येत आहे.या प्रकारावर गॅमन इंडियाचे वैधानिक आॅडिट करणारी नटवरलाल वेपारी अ‍ॅण्ड कंपनी चार वर्षांपासून वार्षिक अहवालात आक्षेप नोंदवत आहे. पण गॅमन इंडियाने हे आक्षेप दूर करण्यासाठी कुठल्याही उपाययोजना केलेल्या नाहीत.अध्यक्ष राजन यांनी संकटकाळात कंपनीला तारुन नेले व कंपनीवरील कर्जाची पुनर्बांधणी केली म्हणून त्यांच्याकडून ही रक्कम त्यांच्याकडून वसूल करण्यात येऊ नये व माफ करावी असा कंपनीचा युक्तिवाद आहे. यामुळेच राजन यांना दिलेले ३०.५४ कोटी रुपये माफ करण्यासासाठी परवानगी द्यावी, असा अर्ज गॅमन इंडियाने कंपनी व्यवहार मंत्रालयाकडे केला होता. तो अर्ज कंपनी व्यवहार मंत्रालयाने २४ नोव्हेंबर २०१६ रोजी फेटाळून लावला. त्यानंतरही माघार न घेता गॅमन इंडियाने २९ जून २०१७ ला विशेष आमसभा बोलवली. त्यामध्ये रक्कम माफीचा ठराव चर्चेसाठी ठेवला. त्यातही कंपनीच्या भागधारकांनी ठराव फेटाळून लावला. 

टॅग्स :Crimeगुन्हा