शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

गांबिया ते नागपूर : भारतीय निकृष्ट औषधांचा मृत्यूचा साखळी प्रयोग!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2025 15:11 IST

Nagpur : भारताची औषधनिर्मितीत केवळ 'खिशाला परवडणारी औषधे' पुरविणारा देश म्हणून प्रतिमा आहे. ती बदलून 'गुणवत्तापूर्ण औषधांचा पुरवठा करणारा एकमेव देश' अशी प्रतिमा होणे अपेक्षित आहे. केवळ त्या प्रतिमेवरच पुढे भारतीय उत्पादकांचे आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावर अस्तित्व टिकून राहील.

नागपूर : मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये अलीकडेच विषारी कफ सिरपमुळे २६ मुलांचा मृत्यू झाला. 'सेसन फार्मास्युटिकल्स'ने बनवलेल्या कोल्ड्रिफ सिरपमध्ये ४८.६% डायथिलीन ग्लायकोल (डीईजी) हे रसायन असल्याचे चाचणीत आढळले. इतक्या प्रमाणात सेवन केल्यावर ते विष होते. तामिळनाडू येथील 'सेसन'ने सुरक्षाविषयक गंभीर उल्लंघने उघडकीस आली. औषधनिर्मितीसाठी वापरण्या योग्य नसलेली नॉन-फार्माग्रेड रसायने, गंजलेली उपकरणे तेथे आढळली. 

२०१९-२० मध्ये जम्मू-काश्मीरमध्ये निकृष्ट दर्जाच्या कफ सिरपमुळे ११ मुलांचा मृत्यू झाला होता. हे सिरप हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, हरयाणा, उत्तर प्रदेश, तामिळनाडू, मेघालय, त्रिपुरा येथेही विकले गेले होते. २०२२ मध्ये डीईजी दूषित भारतीय बनावटीचे कफ सिरप प्यायल्याने गांबियामध्ये ७० हून अधिक मुलांचा मृत्यू झाला होता. तसेच उझबेकिस्तानमध्ये १८ मुले दगावली होती.

२०२४ मध्ये कर्नाटकातील बेल्लारी जिल्हा रुग्णालयात ३४ महिलांची सिझेरिअन प्रसूती झाली. त्यापैकी सात महिलांना मूत्रपिंड दुखापत, अवयव निकामी होणे अशा गुंतागुंत होऊन ५ महिलांचा मृत्यू झाला.

भारतीय औषध गुणवत्ता नियमनातील उणिवा

२००३ मध्ये शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर समितीने भारतातील औषध नियमन व्यवस्थेचा अभ्यास करून भारत सरकारला एक अहवाल सादर केला होता. त्यात त्यांनी काही त्रुटी ताबडतोब दूर करणे आवश्यक असल्याचे म्हटले होते.

भारतातील जवळपास अर्ध्या राज्य औषध चाचणी प्रयोगशाळांमध्ये योग्य उपकरणे किंवा पात्र विश्लेषकांचा अभाव आहे.अमेरिकेत ४८ राज्ये आणि प्यूर्टो रिकोमध्ये सुमारे २,५०० औषध उत्पादक आणि १,५८० बायोफार्मास्युटिकल उत्पादन सुविधा आहेत. यावर देखरेख करण्यासाठी, एफडीएतर्फे देशभरात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर शास्त्रज्ञ, निरीक्षक आणि प्रशासकांसह १८,००० हून अधिक लोक कार्यरत आहेत. त्या तुलनेत, भारतात ३,००० हून अधिक औषध कंपन्यांमध्ये सुमारे १०,५०० औषध उत्पादन युनिट्स आहेत. ही संख्या अमेरिकेपेक्षा सुमारे चार पट अधिक आहे. तरीही भारतातील नियामक कर्मचारीवर्ग अत्यंत कमी आहे.

भारतात औषध उत्पादनासाठी परवाने राज्य सरकारकडून दिले जातात, तर केंद्र सरकार मानके ठरवते आणि निर्यात हाताळते. यामुळे अंमलबजावणीत विसंगती निर्माण झाली आणि नियमन प्रणाली गुंतागुंतीची आणि अपारदर्शक झाली आहे.

गंभीर दुखापत किंवा मृत्यूला कारणीभूत ठरणाऱ्या बनावट औषधांच्या विक्री आणि उत्पादनासाठी कडक दंडात्मक कारवाईची तरतूद आवश्यक आहे. सध्याच्या कायद्यात तशी कठोर तरतूद नाही. नकली औषधे बनविणाऱ्या उत्पादकांवर जरब बसेल यासाठी यात आमूलाग्र बदल होणे आवश्यक आहे.

भारताचा औषध उद्योग; ना हमी, ना गुणवत्ता 

  • १०,५०० औषध उत्पादन युनिट्स भारतात आहेत.
  • ३,००० कंपन्या औषधनिर्मिती करतात. त्यापैकी...
  • १,४०० युनिट्सना डब्ल्यूएचओ-जीएमपी मान्यताप्राप्त (विकसनशील देशांमध्ये निर्यात करतात.)
  • २६० याप्सनाकाजी मान्यताप्राप्त (विकसित देशांमध्ये निर्यात करतात.)
  • २५३ युरोपियन हत्यारेक्टरेट मेडिसिन मान्यताप्राप्त. (युरोपियन देशांमध्ये निर्यात करतात.)
  • उरलेले हजारो उत्पादक केवळ 'घरगुती वापराचे' औषध तयार करतात.

 

या सर्व घटना मुख्यत्वे कुठे घडल्या? तर भारतामध्ये आणि औषधाबद्दल अजिबातच कायदा सुरक्षितता नसलेल्या किंवा कमी प्रमाणात असलेल्या आफ्रिकन देशांमध्ये. विकसित आणि विकसनशील देशांमध्ये त्या घडल्या नाहीत. कारण त्या देशांमध्ये औषधांच्या गुणवत्तेचे नियमन अतिशय कडक आहे. आपल्याकडे मात्र तसे नाही.

English
हिंदी सारांश
Web Title : India-Made Drug Deaths: Gambia to Nagpur, a Chain of Tragedy!

Web Summary : Substandard Indian drugs caused deaths in Gambia, Uzbekistan, and India. Faulty regulations, inadequate testing labs, and weak penalties enable production of unsafe medicines. A committee report highlighted critical flaws needing urgent correction to prevent further tragedies. Stricter enforcement is essential.
टॅग्स :nagpurनागपूरHealthआरोग्यmedicineऔषधंIndiaभारत