शहरं
Join us  
Trending Stories
1
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
2
RCB दोनशे पार; प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी CSK ला किती धावांवर रोखावे लागेल ते पाहा
3
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
4
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
5
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
6
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
7
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
8
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
9
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
10
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
11
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
12
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
13
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
14
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
15
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
16
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
17
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
18
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
19
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
20
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!

काेराडी वीज केंद्राच्या विस्तारित प्रकल्पाच्या सुनावणीत गाेंधळ; काॅंग्रेस-भाजप आमनेसामने

By निशांत वानखेडे | Published: May 29, 2023 7:18 PM

Nagpur News काेराडी औष्णिक वीज केंद्रात प्रस्तावित ६६० मेगावॅट क्षमतेच्या दाेन नवीन प्रकल्पाच्या संभाव्य प्रदूषणाच्या समस्येवर साेमवारी झालेली जनसुनावणीत गाेंधळ उडाला.

नागपूर : काेराडी औष्णिक वीज केंद्रात प्रस्तावित ६६० मेगावॅट क्षमतेच्या दाेन नवीन प्रकल्पाच्या संभाव्य प्रदूषणाच्या समस्येवर साेमवारी झालेली जनसुनावणीत गाेंधळ उडाला. नव्या प्रकल्पाचे समर्थन करणारे लाेक (भाजपा कार्यकर्ते) आणि काॅंग्रेसच्या नेत्यांमध्ये बाचाबाची आणि एकदुसऱ्याविराेधात नारेबाजी झाली. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले हाेते. पाेलिसांना मध्यस्थी करून गाेंधळ शांत करावा लागला. प्रकल्पाचे समर्थन करणाऱ्या कार्यकर्त्यांद्वारे विराेध करणाऱ्यांच्या बाेलतेवेळी ‘हुटिंग’ केली जात असल्याने अनेकदा भांडणाची परिस्थिती निर्माण झाली हाेती.

१३२० मेगावॅटच्या प्रस्तावित दाेन नव्या प्रकल्पांवर सुचना व आक्षेप नाेंदविण्यासाठी काेराडी वीज केंद्राच्या बांधकाम विभागाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी डाॅ. विपीन इटनकर यांच्या अध्यक्षतेत जनसुनावणी घेण्यात आली. यावेळी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी अशाेक करे व उपप्रादेशिक अधिकारी यु.बी. बहादुले उपस्थित हाेते. काॅंग्रेसच्या साेशल मीडिया सेलचे प्रदेशाध्यक्ष विशाल मुत्तेमवारी यांनी बाेलण्यास सुरुवात केली. त्यांनी प्रदूषण नियंत्रणाच्या मानकांना डावलून प्रकल्प रेटण्यात येत असल्याचा आराेप केला. नागपूर जिल्ह्यातच प्रकल्प का रेटण्यात येत आहे, असा सवाल करीत गावकऱ्यांचे आराेग्य, प्रकल्पासाठी लागणारे पाणी, काेळसा काेल वाॅशरिजमध्ये धुतला जात असताना वीज स्वस्त कशी हाेणार, असे प्रश्न महाजेनकाेला विचारले. महाजेनकाे काही उद्याेजकांच्या दबावात कार्य करीत असल्याचा आराेप त्यांनी केला. काॅंग्रेस शहराध्यक्ष व आमदार विकास ठाकरे यांनी वीज केंद्राच्या राखेचा प्रश्न उपस्थित केला. केंद्राची राख कन्हान नदीत साेडली जात असल्याने नागपूरकरांना प्रदूषित पाणी प्यावे लागत असल्याचा आराेप त्यांनी केला. वीज केंद्राच्या प्रदूषणाचा भार विदर्भावरच का, असा आक्षेप त्यांनी घेतला. काॅंग्रेसचे प्रदेश सचिव संदेश सिंगलकर यांनी जनसुनावणी घेण्यावरच आक्षेप घेत रद्द करण्याची मागणी केली.काॅंग्रेस नेते त्यांचा पक्ष मांडून जात असताना प्रकल्पाच्या समर्थकांनी घाेषणाबाजी सुरू केली. समर्थकांची मतेही ऐकूण घ्यावी, असे म्हणत मुर्दाबाद-जिंदाबादची नारेबाजी सुरू झाली. दाेन्ही पक्ष एकमेकांसमाेर उभे ठाकले. तणावाची परिस्थिती पाहता पाेलिसांनी हस्तक्षेप करून माहाेल शांत केला. यावेळी कांग्रेस महासचिव अतुल कोटेचा, उमाकांत अग्निहोत्री, प्रशांत धवड, प्रमोद सिंह ठाकुर आदी उपस्थित हाेते.

राेजगाराचा मुद्दा प्रदूषणावर भारी

जनसुनावणीदरम्यान नव्या प्रकल्पाच्या समर्थकांची संख्या अधिक हाेती. बहुतेक गावच्या ग्रामपंचायत पदाधिकारी, सदस्य व नागरिकांनी बेराेजगारीचा मुद्दा उपस्थित करीत प्रदूषणापेक्षा तरुणांच्या राेजगाराचा मुद्दा महत्त्वाचा असल्याचे सांगितले. समर्थकांत शुभम आवरकर, रिपब्लिकन पार्टी (आ.) बाळू घरडे, मदन राजुरकर, रवी पारधी, वारेगावचे सरपंच कमलाकर बांगडे, खैरीच्या सरपंच याेगिता धांडे, गुमठीच्या सरपंच सीमा माेरे यांचा समावेश हाेता. यातील बहुतेकांनी प्रदूषणाची समस्याच नसल्याचे नमूद केले. मात्र प्रदूषण नियंत्रणासाठी उपाययाेजना करण्यासह परिसरात रुग्णालय, शाळा, ग्रामपंचायतींना विशेष निधी व इतर मूलभुत सुविधा देण्याची मागणी केली. विराेध करणाऱ्यांमध्ये चक्की खापाचे विवेकसिंह सिसाेदिया यांनी मुलांना वीज केंद्राच्या प्रदूषणातून वाचवा असा फलकही झळकाविला. यासह मसाळाचे भैयालाल माकडे, कामठी पंचायत समिती सदस्या दिशा चनकापुरे यांनीही विराेध दर्शविला.

टॅग्स :koradi damकोराडी प्रकल्पagitationआंदोलन