गडकरी माझे मोठे बंधू आहेत, त्यांच्या आशीर्वादाने विजयी होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 13:45 IST2019-03-15T11:03:08+5:302019-03-15T13:45:09+5:30
नितीन गडकरी हे माझे मोठे बंधू आहेत, त्यांच्या आशीर्वादाने मी चार लाख मतांनी विजयी होईन असे उद््गार काँग्रेसचे लोकसभा उमेदवार नाना पटोले यांनी येथे काढले.

गडकरी माझे मोठे बंधू आहेत, त्यांच्या आशीर्वादाने विजयी होणार
ठळक मुद्देनाना पटोले यांचे नागपूर रेल्वेस्थानकावर स्वागत
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: नितीन गडकरी हे माझे मोठे बंधू आहेत, त्यांच्या आशीर्वादाने मी चार लाख मतांनी विजयी होईन असे उद््गार काँग्रेसचे लोकसभा उमेदवार नाना पटोले यांनी येथे काढले. राहुल गांधी यांनी माझ्यावर विश्वास दाखवला आहे. या निवडणुकीत काँग्रेस एक दिलाने काम करणार असल्याचे ते पुढे म्हणाले. शुक्रवारी सकाळी नागपूर रेल्वे स्थानकावर त्यांचे स्थानिक कार्यकर्त्यांनी ढोलताशाच्या गजरात स्वागत केले. यावेळी काँग्रेसचे विकास ठाकरे आदी नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सविस्तर वृत्त लवकरच देत आहोत.