गडकरींना राहुल गांधींचे विचार पटतात : आशिष देशमुख यांचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2019 10:42 PM2019-01-07T22:42:51+5:302019-01-07T22:48:05+5:30

भाजपाच्या खेम्यातून कॉंग्रेसमध्ये दाखल झालेले माजी आमदार आशिष देशमुख यांनी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदामंत्री नितीन गडकरी यांच्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. गडकरी कुणाच्या भीतीपोटी विविध वक्तव्ये करीत असल्याचा सवाल उपस्थित करत माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरु, इंदिरा गांधी यांची प्रशंसा करणाऱ्या गडकरी यांना कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचेदेखील विचार पटत असल्याचा दावा त्यांनी पत्रपरिषदेदरम्यान केला.

Gadkari agree with Rahul Gandhi's thinking: Ashish Deshmukh's claim | गडकरींना राहुल गांधींचे विचार पटतात : आशिष देशमुख यांचा दावा

गडकरींना राहुल गांधींचे विचार पटतात : आशिष देशमुख यांचा दावा

Next
ठळक मुद्दे पत्रपरिषदेत अनेक प्रश्नही केले उपस्थित

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भाजपाच्या खेम्यातून कॉंग्रेसमध्ये दाखल झालेले माजी आमदार आशिष देशमुख यांनी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदामंत्री नितीन गडकरी यांच्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. गडकरी कुणाच्या भीतीपोटी विविध वक्तव्ये करीत असल्याचा सवाल उपस्थित करत माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरु, इंदिरा गांधी यांची प्रशंसा करणाऱ्या गडकरी यांना कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचेदेखील विचार पटत असल्याचा दावा त्यांनी पत्रपरिषदेदरम्यान केला.
नितीन गडकरी यांनी मागील काही दिवसांत केलेल्या वक्तव्यांमध्ये काही छुपा संदेश आहे का व कुणाच्या भीतीने ते कासावीस झाले आहेत, असा प्रश्न देशमुख यांनी उपस्थित केला. नागपुरात किती बेरोजगार तरुणांना रोजगार प्राप्त झाला, याची सविस्तर माहिती गडकरी यांनी जाहीर करावी, अशी मागणीदेखील त्यांनी केली.
इंदिरा गांधी यांनी आपल्या पक्षातील निष्ठावान पुरुष नेत्यांमध्ये आपले कर्तृत्व सिद्ध करून दाखवले होते. यासाठी त्यांनी कुठल्याही आरक्षणाचा लाभ घेतला होता का? त्या महिला सक्षमीकरणाच्या आदर्श होत्या, असे गौरवोद्गार गडकरी यांनी रविवारी काढले होते.

 

Web Title: Gadkari agree with Rahul Gandhi's thinking: Ashish Deshmukh's claim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.