गडचिरोलीत बॉम्बस्फोटातील जखमी जवान नागपुरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 00:56 IST2018-03-06T00:56:00+5:302018-03-06T00:56:39+5:30
नक्षलवाद्यांनी केलेल्या बॉम्बस्फोटात जखमी झालेल्या गडचिरोलीतील दोन जवानांना विशेष हेलिकॉप्टरने सोमवारी सकाळी नागपुरातील आॅरेंजसिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

गडचिरोलीत बॉम्बस्फोटातील जखमी जवान नागपुरात
ठळक मुद्दे जखमी जवान धोक्याबाहेर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नक्षलवाद्यांनी केलेल्या बॉम्बस्फोटात जखमी झालेल्या गडचिरोलीतील दोन जवानांना विशेष हेलिकॉप्टरने सोमवारी सकाळी नागपुरातील आॅरेंजसिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
राजेश संतराम चावर (वय ४५) आणि अतुल श्रावणजी तावडे (वय ३७), अशी जखमी जवानांची नावे आहेत. राजेश चावर यांच्या चेहरा तसेच छातीला जखमा झाल्या असून, अतुल तावडे यांच्या कपाळाला तसेच उजव्या खांद्याला जबर जखम झाली आहे. या दोघांवरही अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून, दोघांचीही प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती संबंधित सूत्रांनी दिली आहे.