शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

फुटाळा, सक्करदरा सलाईनवर : गणपती विसर्जनानंतर तलावाची अवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2019 22:32 IST

विसर्जनानंतर तलाव किती प्रदूषित झाले याचा आढावा ग्रीन व्हिजिल या पर्यावरणवादी संस्थेने घेतला. काही सूक्ष्म निरीक्षणाद्वारे आलेल्या निष्कर्षावरून फुटाळा व सक्करदरा तलाव सलाईनवर असल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्देपर्यावरणवादी संस्थेने केले तलावातील पाण्याचे निरीक्षण

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : तलाव हा शहराचा ऐतिहासिक ठेवा आहे. पूर्वी तलावाचा उपयोग व्हायचा. मात्र आता तलाव हे फक्त धार्मिक विसर्जनासाठी वापरले जातात. विसर्जनामुळे तलाव प्रदूषित होत असल्याने महापालिकेने यावर्षी फुटाळा सोडल्यास चार तलावावर निर्बंध घातले. विसर्जनानंतर तलाव किती प्रदूषित झाले याचा आढावा ग्रीन व्हिजिल या पर्यावरणवादी संस्थेने घेतला. काही सूक्ष्म निरीक्षणाद्वारे आलेल्या निष्कर्षावरून फुटाळा व सक्करदरा तलाव सलाईनवर असल्याचे दिसून येत आहे. तर सोनेगाव व गांधीसागर तलावाची अवस्था ठिकठाक असल्याचे दिसते आहे.‘अर्थ इको इंटरनॅशनल’ या आंतरराष्ट्रीय संस्थेसोबत मिळून ग्रीन व्हिजिल संस्थेने गणपती विसर्जनानंतर शहरातील चार मुख्य तलावांचे निरीक्षण केले. संस्थेने गणपती विसर्जनापूर्वीसुद्धा तलावाचे निरीक्षण केले होते. विसर्जनानंतर केलेल्या निरीक्षणात फुटाळा व सक्करदरा तलावाच्या पाण्यात प्रदूषण झाल्याचे निदर्शनास आले. या निरीक्षणात त्यांनी तलावातील पाण्याचे पीएच, गढुळपणा व पाण्यात मिसळलेले ऑक्सिजन याचे परीक्षण केले. या परीक्षणात गणपती विसर्जनाचा सर्वाधिक फटका फुटाळा तलावाला बसल्याचे दिसून आले. गणपती विसर्जनापूर्वी फुटाळ्यात ऑक्सिजनची मात्रा ४ ते ४.५ मिलीग्रॅम होती. विसर्जनानंतर ३ ते ३.५ मिलीग्रॅम नोंदविण्यात आली. तलावाच्या पाण्यात गढुळपणासुद्धा वाढल्याचेही दिसून आले. तलावातील पाण्याचा पीएच मात्र कायम होता. सक्करदरा तलावात गणपती विसर्जनावर निर्बंध घातले होते. परंतु तलावात मोठ्या प्रमाणात जलकुंभ आहेत. त्यामुळे ऑक्सिजनच्या मात्रेवर परिणाम झाला आहे. तलावातील पाण्यात गढुळपणा वाढला असून, पीएच कायम आहे.गांधीसागर व सोनेगावची स्थिती बरीमनपाने गांधीसागर व सोनेगाव तलावात गणपतींच्या मूर्तीचे विसर्जन होऊ नये म्हणून उपाययोजना केल्या होत्या. येथे विसर्जन झाले नाही. त्यामुळे या दोन्ही तलावाच्या पाण्याच्या ऑक्सिजनच्या मात्रेत फारसा फरक पडला नाही. गढुळपणाही कमी आढळून आला. तलावातील पीएच बऱ्यापैकी आहे. तलावाच्या इको सिस्टमवर होतोय परिणामतलावातील पाण्यात ऑक्सिजनची मात्रा कमी झाल्याने त्याचा परिणाम जलचरावर होतो. फुटाळ्यात मोठ्या प्रमाणात झालेले विसर्जन लक्षात घेता, त्याची सफाई लवकरात लवकर होणे आवश्यक आहे. बंद पडलेले कारंजे तत्काळ सुरू करणे आवश्यक आहे. डिजॉल्ड ऑक्सिजनची मात्रा दोन मिलिग्रॅमपर्यंत गेल्यास तलावाची इको सिस्टम बिघडू शकते. तसेच सक्करदरा तलावातील जलकुंभ साफ करणे गरजेचे आहे.सुरभी जैस्वाल, टीम लीडर, ग्रीन व्हिजिल

टॅग्स :Futala Lakeफुटाळा तलावpollutionप्रदूषण