माळढोक, तनमोरच्या संवर्धनासाठी निधी मिळाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2020 00:07 IST2020-10-21T00:05:43+5:302020-10-21T00:07:23+5:30
Cranes birds, Coservation funds, Nagpur News राज्यातील माळढोक, तनमोर या पक्ष्यांच्या अधिवासासाठी आणि संवर्धन विकासासाठी वन विभागाने वाषिर्क आराखडा तयार केला आहे. या आराखड्यातील ६३ लाख रुपयांच्या निधीचा पहिला हप्ता वितरित करण्यात आला आहे.

माळढोक, तनमोरच्या संवर्धनासाठी निधी मिळाला
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्यातील माळढोक, तनमोर या पक्ष्यांच्या अधिवासासाठी आणि संवर्धन विकासासाठी वन विभागाने वाषिर्क आराखडा तयार केला आहे. या आराखड्यातील ६३ लाख रुपयांच्या निधीचा पहिला हप्ता वितरित करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्देशानुसार वन विभागाने हा निर्माणय घेतला आहे. माळढोक आणि तनमोर या दुर्मिळ पक्ष्यांच्या अधिवास विकासासाठी वरोरा (चंद्रपूर), नान्नज (सोलापूर), आणि अकोला वन विभागासाठी या आराखड्यातील निधीचा पहिला हप्ता वितरित करण्यात आल्याची माहिती वनमंत्री संजय ठाकरे यांनी मंगळवारी मुंबईत दिली.
माळढोक आणि तनमोर हे पक्षी दुर्मिळ व संकटग्रस्त झाले आहेत. अलिकडेच ‘लोकमत’ने यावर प्रकाश टाकला होता. या पक्ष्यांच्या संवर्धनासाठी मुख्यमंत्री अनुकूुल आहेत. २०२०-२१ या वर्षासाठी १ कोटी २५ लाख रुपयांचा वार्षिक आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यामधून या पक्ष्यांच्या अधिवास विकासासाठी वन विभागामार्फत उपाययोजना केल्या जाणार आहेत.