शहरं
Join us  
Trending Stories
1
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
2
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
3
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
4
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
5
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
6
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
7
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
8
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
9
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
10
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
11
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
12
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
13
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
14
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
15
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
16
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
17
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
18
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
19
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
20
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
Daily Top 2Weekly Top 5

संस्कारक्षम पिढी घडविण्यात ‘लोकमत’ची मौलिक भूमिका

By admin | Updated: January 11, 2015 00:48 IST

आजच्या स्पर्धेच्या युगात संस्कारक्षम पिढी घडविण्यासाठी लोकमत वृत्तपत्र मोलाची भूमिका पार पाडत आहे. संस्काराचे मोती, जंगल सफारी अशा स्पर्धांमुळे सुसंस्कृत विद्यार्थी घडतात,

चंद्रशेखर बावनकुळे : संस्काराचे मोती स्पर्धेचे बक्षीस वितरण कामठी : आजच्या स्पर्धेच्या युगात संस्कारक्षम पिढी घडविण्यासाठी लोकमत वृत्तपत्र मोलाची भूमिका पार पाडत आहे. संस्काराचे मोती, जंगल सफारी अशा स्पर्धांमुळे सुसंस्कृत विद्यार्थी घडतात, असे मत ऊर्जा व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले. स्थानिक स्वामी अवधेशानंद पब्लिक स्कूल येथे लोकमततर्फे राबविण्यात आलेल्या संस्काराचे मोती या स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले. याप्रसंगी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रारंभी पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वतीच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले. यावेळी सदाशिवराव पाटील शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा माजी आ. यादवराव भोयर, माजी जि. प. अध्यक्ष सुरेश भोयर, नगर परिषद उपाध्यक्ष रणजित सफेलकर, तहसीलदार डी. एस. भोयर, नायब तहसीलदार वरपे, उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश कंतेवार, ठाणेदार सतीश गोवेकर, संचालक अनुराग भोयर, उपविभागीय पोलीस अधिकारी नवनाथ ढवळे, प्राचार्य प्रिया अतकरे, विवेक मंगतानी आदी उपस्थित होते. पालकमंत्री बावनकुळे पुढे म्हणाले, राज्य शासनाकडून व्यवसायाभिमुख अभ्यास सुरू करण्याचा प्रयत्न असून विद्यार्थ्यांना स्वयंरोजगार उभारण्यास उत्तम संधी मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. लोकमतच्या उपक्रमांची त्यांनी प्रशंसा केली. स्पर्धेत पूर्वी पुरुषोत्तम पोटभरे (प्रथम), अंजली अविनाश मेश्राम (द्वितीय), असित सुखदेव (तृतीय) तसेच १२ विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर पुरस्काराने गौरविण्यात आले. प्रास्ताविक सुदाम राखडे यांनी केले. संचालन संगीता उपाध्याय यांनी तर आभार प्राचार्य प्रिया अतकरे यांनी मानले. कार्यक्रमास पुष्पा पिल्ले, सीमा गडकरी, प्रीती चिखलकर, विशाखा घाटे, अविनाश धोटे आदींनी सहकार्य केले. कार्यक्रमास नितीन रावेकर, उज्ज्वल रायबोले, संदीप कामळे, वाजीद अली, श्यामलाल शर्मा, राजेश गोलर आदी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)