शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेच्या जेवणावर क्यूआर कोड स्कॅन करताच दिसणार पूर्ण कुंडली; आयआरसीटीसीचा तक्रारींवर उपाय

By नरेश डोंगरे | Updated: March 21, 2026 19:43 IST

Nagpur : ट्रेनमध्ये मिळणाऱ्या बेचव आणि दर्जाहीन खाद्यपदार्थांबाबत वारंवार येणाऱ्या तक्रारीला पूर्णविराम देण्यासाठी इंडियन रेल्वे केटरिंग ॲण्ड टूरिझम कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी)ने प्रभावी उपाययोजना आखली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ट्रेनमध्ये मिळणाऱ्या बेचव आणि दर्जाहीन खाद्यपदार्थांबाबत वारंवार येणाऱ्या तक्रारीला पूर्णविराम देण्यासाठी इंडियन रेल्वे केटरिंग ॲण्ड टूरिझम कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी)ने प्रभावी उपाययोजना आखली आहे. त्यानुसार आता ट्रेनमध्ये मिळणाऱ्या खाद्यपदार्थांच्या पॅकेटवर क्यूआर कोड लावण्यात येत आहे. तो स्कॅन करताच प्रवाशांना फूड पॅकेटची पूर्ण कुंडलीच दिसणार आहे.

रेल्वेत मिळणाऱ्या खाद्य पदार्थांबाबत नियमित वेगवेगळ्या तक्रारी असतात. त्याचा दर्जा ठिक नसतो, ते थंड असतात किंवा शिळे असतात, असे तक्रारींचे स्वरूप असते. अनेक गाड्यांमध्ये बेकायदेशीर विक्रेतेही अन्न विकतात. त्यामुळे प्रवाशांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची भीती असते. त्यावर उपाय म्हणून रेल्वेने क्यूआर कोड सिस्टम लागू केली आहे. त्यानुसार, ट्रेनमध्ये प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या फूड पॅकेटवर एक क्यूआर कोड असेल. तो स्कॅन केल्यावर हातात असलेले खाद्यान्न कधी तयार केले, ते कधी पॅकिंग करण्यात आले. त्याची कालबाह्य होण्याची तारीख (एक्सपायरी डेट) तसेच ज्या ठिकाणी हे अन्न तयार झाले, त्या किचनचे नाव संबंधित प्रवाशांना तत्काळ माहिती पडेल. त्यावरून हे खाद्यान्न ताजे आणि सुरक्षित आहे की नाही, ते प्रवाशांना लगेच कळेल.

बेकायदेशीर विक्रेत्यांवर लगाम

अनेक गाड्यांमध्ये अनधिकृत वेंडर वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यान्न विकतात. या प्रणालीमुळे बेकायदेशीर अन्न विक्रीला आळा बसणार आहे. क्यूआर कोड नसलेले पॅकेट सहज ओळखता येईल. त्यामुळे अनधिकृत विक्रेत्याची डिजिटल पुराव्यासह लगेच तक्रार नोंदविता येणार आहे.

तक्रार करणे झाले सोपे

क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर माहिती चुकीची आढळली किंवा अन्न खराब निघाले, तर प्रवासी लगेच ‘रेल मदत’ पोर्टल किंवा अधिकृत ॲपद्वारे तक्रार करू शकणार आहे. विशेष म्हणजे, तक्रारीसोबत स्कॅनरच्या रूपातील डिजिटल पुरावादेखील जोडता येणार आहे. परिणामी, संबंधितांवर लगेच आणि प्रभावी कारवाई होण्याची शक्यता वाढली आहे.

"प्रवाशांना रेल्वे प्रशासनाकडून अधिकाधिक चांगल्या सुविधा देण्याचे प्रयत्न आहेत. त्याचाच हा एक भाग आहे."-अमन मित्तल, विभागीय वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक, मध्य रेल्वे, नागपूर.

English
हिंदी सारांश
Web Title : QR code on railway food reveals details, addresses complaints.

Web Summary : IRCTC introduces QR codes on food packets, offering complete details like preparation and expiry date, empowering passengers to verify food quality and easily lodge complaints via the Rail Madad portal, curbing unauthorized sales.
टॅग्स :nagpurनागपूरIndian Railwayभारतीय रेल्वे