नागपूर जिल्ह्यात पोस्टमास्तरने केली ९० हजारांची अफरातफर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2018 01:48 PM2018-01-29T13:48:22+5:302018-01-29T13:51:49+5:30

पोस्ट मास्तरने ग्राहकांच्या खोट्या स्वाक्षऱ्या करून त्यांच्या आरडी आणि एसएसए बचत खात्यातील रकमेची परस्पर उचल केली. ही रक्कम ९० हजार रुपये आहे. हा प्रकार सावनेर तालुक्यातील वाघोडा येथे घडला असूून, नुकताच उघडकीस आला आहे.

Fraud of 90 thousand by postmaster in Nagpur district | नागपूर जिल्ह्यात पोस्टमास्तरने केली ९० हजारांची अफरातफर

नागपूर जिल्ह्यात पोस्टमास्तरने केली ९० हजारांची अफरातफर

Next
ठळक मुद्देवाघोडा पोस्ट आॅफिसमधील प्रकार खोट्या स्वाक्षऱ्यांद्वारे रकमेची उचल

लोकमत न्यूज नेटवर्क
सावनेर : पोस्ट मास्तरने ग्राहकांच्या खोट्या स्वाक्षऱ्या करून त्यांच्या आरडी आणि एसएसए बचत खात्यातील रकमेची परस्पर उचल केली. ही रक्कम ९० हजार रुपये आहे. हा प्रकार सावनेर तालुक्यातील वाघोडा येथे घडला असूून, नुकताच उघडकीस आला आहे.
गंगाधर नत्थूजी ठाकरे, रा. वाघोडा, ता. सावनेर असे आरोपी पोस्ट मास्तरचे नाव आहे. गंगाधर ठाकरे हे मागील काही वर्षांपासून वाघोडा येथील पोस्ट आॅफिसमध्ये पोस्ट मास्तरपदी कार्यरत आहेत. वाघोडा आणि परिसरातील काही गावांमधील काही नागरिकांनी पोस्टात आरडी आणि एसएसए खात्यात गुंतवणूक केली आहे. शिवाय, त्यांनी या रकमेचा पोस्ट विभागाकडे नियमित भरणाही केला आहे. दरम्यान, पोस्ट मास्तर गंगाधर ठाकरे यांनी काही ग्राहकांना कोणतीही पूर्वसूचना न देता त्यांच्या खोट्या स्वाक्षऱ्या केल्या आणि ग्राहकांनी आरडी व एसएसए खात्यात गुंतवलेल्या एकूण ९० हजार रुपयांची परस्पर उचल केली. हा प्रकार लक्षात येताच ग्राहकांनी काटोल उपविभागाचे डाक निरीक्षक शिवम आनंदकुमार शंकर (२५) यांच्याकडे तक्रारी केल्या. या तक्रारी गांभीर्याने घेत शिवम शंकर यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली. त्यात गंगाधर ठाकरे यांनी काही ग्राहकांच्या आरडी व एसएसए खात्यातून रकमेची उचल केल्याचे स्पष्ट झाले.

Web Title: Fraud of 90 thousand by postmaster in Nagpur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :crimeगुन्हे