नागपुरात अल्पवयीन मुलीसोबत चार वर्षांपासून शरीरसंबंध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 23:47 IST2019-05-20T23:46:32+5:302019-05-20T23:47:15+5:30

१३ व्या वर्षी पहिल्यांदा बलात्कार केल्यानंतर घरमालक आरोपीने नंतर तिला लग्नाचे आमिष दाखवून तब्बल चार वर्षे तिच्याशी शरीरसंबंध जोडले. आता मात्र दुसऱ्याच मुलीसोबत त्याने लग्न करण्याची तयारी दाखविल्याने त्याच्या प्रेयसीने हुडकेश्वर ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यावरून पोलिसांनी आरोपी राहुल बोंद्रे नामक आरोपीविरुद्ध बलात्कार करून धमकी देण्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला.

Four years of body correlation with a minor girl in Nagpur | नागपुरात अल्पवयीन मुलीसोबत चार वर्षांपासून शरीरसंबंध

नागपुरात अल्पवयीन मुलीसोबत चार वर्षांपासून शरीरसंबंध

ठळक मुद्देलग्नाचे आमिष दाखवून आरोपीचे घूमजाव

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : १३ व्या वर्षी पहिल्यांदा बलात्कार केल्यानंतर घरमालक आरोपीने नंतर तिला लग्नाचे आमिष दाखवून तब्बल चार वर्षे तिच्याशी शरीरसंबंध जोडले. आता मात्र दुसऱ्याच मुलीसोबत त्याने लग्न करण्याची तयारी दाखविल्याने त्याच्या प्रेयसीने हुडकेश्वर ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यावरून पोलिसांनी आरोपी राहुल बोंद्रे नामक आरोपीविरुद्ध बलात्कार करून धमकी देण्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला.
मुलीच्या तक्रार अर्जानुसार ती आता १७ वर्षांची असून, तिने नुकतीच अकरावीची परीक्षा दिली आहे. तिचे आई-वडील गरीब असून ते मोलमजुरी करतात. चार वर्षांपूर्वी आरोपी राहुल बोंद्रेच्या घरी ते भाड्याने राहत होते. एक दिवस मुलगी आणि तिचा लहान भाऊ दोघेच घरी असताना आरोपी राहुलने तिच्या भावाला दुसऱ्या खोलीत बंद केले आणि तिला स्वत:च्या घरात नेऊन तिच्यासोबत शरीरसंंबंध जोडले. यावेळी त्याने भावाला मारण्याची धमकी देऊन तिला गप्प राहण्यास सांगितले. त्यानंतर त्याने तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी वारंवार शरीरसंबंध जोडणे सुरू केले. मुलीच्या आई-वडिलांनी घर बदलविले तरी राहुल आणि मुलीचे प्रेमप्रकरण सुरूच राहिले. तो तिला कधी स्वत:च्या घरी तर कधी बांधकामस्थळी नेऊन तिच्याशी शरीरसंबंध जोडायचा. काही महिन्यांपूर्वी या दोघांच्या संबंधाचा बोभाटा झाल्याने तिने पोलिसांत तक्रार करण्याची धमकी दिली. त्यामुळे राहुलच्या आई आणि भावाने तिच्या आई-वडिलांसोबत बोलणी करून या दोघांचे लग्न करण्याचा निर्णय घेतला. मुलीला १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर लग्न करण्याचे ठरले. मात्र, काही दिवसांपूर्वी त्याने दुसºयाच एका मुलीसोबत लग्न जुळविले. ते माहीत पडल्याने मुलीने राहुलच्या आई आणि भावाशी संपर्क केला. यावेळी त्यांनी मुलीला अश्लील शिवीगाळ करून धमकी दिली. त्यामुळे मुलीने आज हुडकेश्वर ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. पोलिसांनी राहुलविरुद्ध पोक्सो कायद्यानुसार बलात्काराचा तसेच धमकी देण्याचा गुन्हा दाखल केला.
आई आणि भाऊही अडकला
आधी लग्नाची मागणी घालून नंतर शिवीगाळ केल्यामुळे राहुलची आई आणि भाऊ या दोघांविरुद्धही मुलीने तक्रारीत आरोप लावले आहे. त्यावरून पोलिसांनी राहुलसोबतच या दोघांनाही आरोपी केले आहे. सोमवारी सायंकाळी या प्रकरणात हुडकेश्वर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे.

Web Title: Four years of body correlation with a minor girl in Nagpur