पाचपैकी चार ग्रा.पं. महाविकास आघाडीकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:08 IST2021-02-13T04:08:55+5:302021-02-13T04:08:55+5:30
हिंगणा : हिंगणा तालुक्यात झालेल्या सरपंच आणि उपसरपंचपदाच्या निवडणुकीत पाचपैकी चार ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेना या मित्रपक्षांच्या ...

पाचपैकी चार ग्रा.पं. महाविकास आघाडीकडे
हिंगणा : हिंगणा तालुक्यात झालेल्या सरपंच आणि उपसरपंचपदाच्या निवडणुकीत पाचपैकी चार ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेना या मित्रपक्षांच्या महाविकास आघाडीचे सरपंच व उपसरपंच विजयी झाले.
गट ग्रामपंचायत किन्ही-धानोलीच्या सरपंचपदी आशा सुरेश निघोट, तर उपसरपंचपदी संगीता संजय भोपे, गट ग्रामपंचायत सावंगी (आसोला) च्या सरपंचपदी शेषराव गणपत नागमोते, तर उपसरपंचपदी रागिणी भूषण अडकीने, गट ग्रामपंचायत खडकीच्या सरपंचपदी अर्चना सुधाकर धुर्वे, तर उपसरपंचपदी शारदा संजय मसराम, गट ग्रामपंचायत सातगाव (वेना) च्या सरपंचपदी योगेश वामन सातपुते, तर उपसरपंचपदी प्रवीणा सतीश शेळके विजय झाल्या. दाभा-आगारगाव गट ग्रा.पं.च्या सरपंचपदी भाजप समर्थित शीला श्रावण मरपाची यांची निवड झाली. रायपूर जिल्हा परिषद सर्कलमधील निवडणूक झालेल्या किन्ही धानोली गट ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंचाचे जिल्हा परिषद सदस्य दिनेश बंग व पंचायत समिती सदस्य सुनील बोंदाडे यांनी अभिनंदन केले.