शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
2
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
3
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
4
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
5
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
6
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
7
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
8
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
9
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ
10
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
11
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
12
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
13
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
14
पावसाची उसंत पण धरणाातून पाण्याचा विसर्ग; नद्या आल्या रस्त्यांवर, पुराचा विळखा अजूनही घट्ट
15
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
16
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
17
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
18
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
19
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
20
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा

ऑक्सिजनअभावी रुग्णांच्या मृत्यूची चार सदस्यीय समितीकडून चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2021 07:47 IST

वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांकडून दखल : ऑक्सिजन गॅस प्लँटची तपासणी

नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) ट्रॉमा केअर सेंटरमधील ‘अतिदक्षता विभाग-१’मधील ऑक्सिजन पुरवठा रविवारी पहाटे अचानक बंद झाल्याने एकामागोमाग एक अशा तीन रुग्णांच्या मृत्यूच्या घटनेने सोमवारी राज्यात खळबळ उडाली. वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख व पालकमंत्री नितीन राऊत यांनी याची गंभीर दखल घेऊन तातडीने चौकशी करण्याच्या सूचना दिल्या. मेडिकल प्रशासनाने चार सदस्यीय समिती स्थापन करून चौकशीला सुरुवात केली. सोबतच ऑक्सिजन गॅस प्लँटची थर्ड पार्टीकडून तपासणी करण्याचेही निर्देश दिले.भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात १० चिमुकल्यांचे बळी जाण्याचे प्रकरण ताजे असताना मेडिकलच्या या घटनेने शासकीय रुग्णालयातील रुग्णसेवेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. मेडिकलच्या ट्रॉमा केअर सेंटरचा ‘अतिदक्षता विभाग-१’मध्ये (आयसीयू) रविवारी पहाटे साधारण अर्ध्या तासासाठी ऑक्सिजन पुरवठा खंडित झाला. यामुळे अर्ध्या-अर्ध्या तासाच्या कालावधीत तीन गंभीर रुग्णांचा मृत्यू झाला. याची माहिती वरिष्ठ डॉक्टरांना देण्यात आली. तातडीने उपाययोजना केल्याने उर्वरित सहा रुग्णांचे प्राण वाचले. या धक्कादायक घटनेला ‘लोकमत’ने समोर आणताच खळबळ उडाली.   वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय, विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार व वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांच्याकडून या प्रकरणाची तपशीलवार माहिती घेत सखोल चौकशी करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या.डॉ. सुशांत मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्यीय समिती मेडिकल प्रशासनाने ‘लोकमत’ला दिलेल्या पत्रानुसार अधिष्ठाता डॉ. मित्रा यांनी सोमवारी ‘आयसीयू-१’ची पाहणी केली. यात त्यांना ऑक्सिजन पुरवठा खंडित होऊन रुग्णांचा मृत्यू झाल्याचे आढळून आले नसल्याचे त्यांनी सांगितले. वरिष्ठांच्या सूचनेनुसार पल्मनरी मेडिसीन विभागाचे प्रमुख डॉ. सुशांत मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन केली. यात सदस्य सचिव वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गांवडे, सदस्य म्हणून मेडिसीन विभागाचे प्रमुख डॉ. प्रशांत पाटील व बधिरीकरण विभागाचे प्रमुख वासुदेव बारसागडे यांचा समावेश आहे.५५ ते ६६ टक्के होते रुग्णांचे ऑक्सिजन -मेडिकलने उपलब्ध करून दिलेल्या माहितीनुसार, तिन्ही रुग्णांच्या शरीरातील ऑक्सिजन प्रमाण खूपच कमी होते. नरेश मून यांचे ५७ टक्के (रुम एअरवर), अमोल नाहे यांचे ६६ टक्के (हाय फ्लो ऑक्सिजनवर), तर शिवराम शेंडे यांचे ५५ टक्के (रुम एअरवर) ऑक्सिजन होते. रुग्णांची प्रकृती अतिगंभीर होती.

टॅग्स :nagpurनागपूरhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टरDeathमृत्यू