दाेन अपघातात सख्ख्या भावांसह चाैघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2022 07:25 PM2022-11-29T19:25:28+5:302022-11-29T19:26:20+5:30

Nagpur News नागपूर जिल्ह्यात मंगळवारी (दि. २९) झालेल्या दाेन अपघातांमध्ये चाैघांचा मृत्यू झाला.

Four killed including many brothers in Daen accident | दाेन अपघातात सख्ख्या भावांसह चाैघांचा मृत्यू

दाेन अपघातात सख्ख्या भावांसह चाैघांचा मृत्यू

googlenewsNext

दुचाकींना टिप्परची धडक : वानाडाेंगरी व काेदेगाव परिसरातील घटना

नागपूर : जिल्ह्यात मंगळवारी (दि. २९) झालेल्या दाेन अपघातांमध्ये चाैघांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये दाेन सख्ख्या भावांचा समावेश आहे. दाेन्ही अपघात टिप्परने माेटरसायकलला धडक दिल्याने झाले. पहिला अपघात सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास नागपूर-हिंगणा मार्गावरील वानाडाेंगरी परिसरात तर दुसरा खापा (ता. सावनेर) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील खापा-काेदेगाव मार्गावर सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास झाला.

मृतांमध्ये मोहम्मद आफताब मोहम्मद इस्लाम (२१) व मोहम्मद मुस्तफा मोहम्मद इस्लाम (१८) दाेघेही रा. बिलनपूर (बिहार) या भावांसह लोकेश धनराज धरत (२३) व आदित्य सत्यपाल कनोजिया (२१) दाेघेही रा. सावनेर या चाैघांचा समावेश आहे. मोहम्मद आफताब व मोहम्मद मुस्तफा वानाडाेंगरी येथे राहायचे आणि वाहन दुरुस्तीची कामे करायचे. दाेघेही मंगळवारी सकाळी एमएच-४०/डी-६९१० क्रमांकाच्या माेटरसायकलने जात हाेते. त्यांनी यू टर्न घेताच हिंगण्याहून नागपूरकडे जाणाऱ्या एमएच-३४/एम-८८११ क्रमांकाच्या टिप्परने त्यांच्या माेटरसायकलला धडक दिली. दाेघेही टिप्परच्या चाकाखाली आल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

लाेकेश व आदित्य एमएच-४०/केजे-८०४५ क्रमांकाच्या माेटरसायकलने सावनेरहून खाप्याला येत हाेते. काेदेगाव परिसरात त्यांनी समाेर असलेल्या एमएच-४०/एके-८५५१ क्रमांकाच्या टिप्परला ओव्हरटेक केले. त्यातच टिप्परने माेटरसायकलला धडक दिल्याने ते चाकाखाली आहे. यात एकाचा घटनास्थळीच तर दुसऱ्याचा उपचाराला नेताना वाटेत मृत्यू झाला. या दाेन्ही प्रकरणात एमआयडीसी व खापा पाेलिसांनी टिप्पर चालकांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

दाेन्ही दुचाकीचालक हेल्मेटविना

या अपघातातील दाेन्ही दुचाकी चालकांचा मृत्यू झाला. त्या दाेघांनीही दुचाकी चालविताना हेल्मेटचा वापर केला नव्हता, अशी माहिती एमआयडीसीचे ठाणेदार ठाणेदार भीमा नरके व खाप्याचे ठाणेदार अजय मानकर यांनी दिली. खापा-काेदेगाव राेडच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्याने राेडच्या अर्ध्या भागाने वाहतूक सुरू आहे. त्यातच दुचाकी चालकाने टिप्परला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला आणि ताे जीवावर बेतला.

...

Web Title: Four killed including many brothers in Daen accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात