Four injured in car Accident | भरधाव टिप्परची कारला धडक, चार जण जखमी

भरधाव टिप्परची कारला धडक, चार जण जखमी

भिवापूर- नागपूर वरून भिवापूरला येत असलेल्या कारला  विरूध्द दिशेने येणा-या भरधाव टिप्परने जबर धडक दिल्याने झालेल्या अपघातात चार जण गंभीर जखमी झाले.
सदर अपघात आज (दि.१८) राञी १२ वाजताच्या सुमारास राष्ट्रीयमार्गावरील स्थानिक  ग्रामीण रूग्णालय परिसरात झाला. अपघातातील जखमींमध्ये भिवापूर येथील अरोरा कुटूंबातील तिघांचा तर गांधी कुटूंबातील एकाचा समावेश आहे. भाजप नेते व खरेदी विक्री संस्थेचे अध्यक्ष चरणजीतसिंग अरोरा‌ यांच्या कुटूंबातील सदस्यांचा त्यात समावेश आहे. सर्व जखमींना नागपूरला हलविण्यात आले आहे. अपघातात कारच्या दर्शनीभागाचा अक्षरश: चुराडा झाला आहे. ठाणेदार महेश भोरटेकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस तपासकार्याला लागले आहे.

Web Title: Four injured in car Accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.