बाळासाहेबांना भारतरत्न द्या; प्रवीण तोगडियांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2020 20:56 IST2020-02-05T16:26:44+5:302020-02-05T20:56:18+5:30

राम मंदिराच्या उभारणीत मोलाचे योगदान असलेल्या चार महापुरुषांना केंद्र सरकारने भारतरत्न या पुरस्काराने गौरवावे अशी अपेक्षा आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी येथे एका पत्रपरिषदेत व्यक्त केली आहे.

The four great men who contributed to the construction of the Ram temple should get Bharat Ratna | बाळासाहेबांना भारतरत्न द्या; प्रवीण तोगडियांची मागणी

बाळासाहेबांना भारतरत्न द्या; प्रवीण तोगडियांची मागणी

ठळक मुद्देकेंद्राच्या अपयशामुळे महिलांवरील अत्याचारात वाढ

नागपूर: राम मंदिराच्या उभारणीत मोलाचे योगदान असलेल्या चार महापुरुषांना केंद्र सरकारने भारतरत्न या पुरस्काराने गौरवावे अशी अपेक्षा आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी येथे एका पत्रपरिषदेत व्यक्त केली आहे.
यावेळी बोलताना ते म्हणाले, या चार महापुरुषांमध्ये बाळासाहेब ठाकरे, अशोक सिंघल, महंत रामचंद्र परमहंस व गोरखपिठाधीस महंत अवैद्यनाथ यांचा समावेश होतो. या चौघांनाही भारत रत्नाचा मान दिला जावा. देशातील महिलांवर होत असलेल्या अत्याचारांबाबत बोलताना त्यांनी, केंद्राच्या अपयशामुळे देशातील महिलांवर अत्याचाराचे प्रमाण वाढत असल्याचा आरोप केला.

 

Web Title: The four great men who contributed to the construction of the Ram temple should get Bharat Ratna