नागपुरात विविध भागात चौघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2020 11:38 PM2020-05-12T23:38:48+5:302020-05-12T23:43:03+5:30

शहरातील विविध भागात चौघांचा आकस्मिक मृत्यू झाला. हुडकेश्वर, सदर, लकडगंज आणि इमामवाडा पोलीस ठाण्यात त्यांची अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे.

Four died in different parts of Nagpur | नागपुरात विविध भागात चौघांचा मृत्यू

नागपुरात विविध भागात चौघांचा मृत्यू

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरातील विविध भागात चौघांचा आकस्मिक मृत्यू झाला. हुडकेश्वर, सदर, लकडगंज आणि इमामवाडा पोलीस ठाण्यात त्यांची अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे.
हुडकेश्वरमधील कॉर्पोरेशन कॉलनीत राहणारे विजय रमेशराव इंगळे (वय ४४) हे मंगळवारी सकाळी ८ च्या सुमारास त्यांच्या घरी मृत अवस्थेत आढळून आले. त्यांची आई हरीदिनी रमेशराव इंगळे यांनी दिलेल्या माहितीवरून हुडकेश्वर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली.
सदरमधील राजनगरात राहणाऱ्या भगवती जयशंकर दवे (वय ७८) यांची प्रकृती खालावल्याने त्यांना ६ मे रोजी खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. ७ मे रोजी त्यांचा मृत्यू झाला. उशिरा माहिती मिळाल्यामुळे सदर पोलिसांनी मंगळवारी या प्रकरणात अकस्मात मृत्यूची नोंद केली.
लकडगंजच्या रामपेठमध्ये राहणाऱ्या वत्सलाबाई लक्ष्मण विटणकर (वय ६२) यांची प्रकृती खराब झाल्यामुळे त्यांना मंगळवारी पहाटे ३ च्या सुमारास इस्पितळात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
इमामवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका परप्रांतीय तरुणाचा आकस्मिक मृत्यू झाला. निराधार ईश्वरकुमार वर्मा (वय २८) असे मृत तरुणाचे नाव आहे. तो राजनांदगाव (छत्तीसगड) जिल्ह्यातील खेरगार्ड येथील रहिवासी होता. रोजगाराच्या शोधात नागपुरात आलेल्या वर्माची प्रकृती खालावल्यामुळे त्याला एका इसमाने रविवारी रात्री ९ च्या सुमारास मेडिकलमध्ये भरती केले. उपचारादरम्यान सोमवारी दुपारी ४.२०च्या सुमारास डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. इमामवाडा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली.

Web Title: Four died in different parts of Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.