साडेचार टन प्लास्टिक जप्त()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:20 IST2021-01-13T04:20:06+5:302021-01-13T04:20:06+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने मंगळवारी सकाळी ६.१५ च्या सुमारास गांधीबाग झोनमधील रियाज ...

साडेचार टन प्लास्टिक जप्त()
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने मंगळवारी सकाळी ६.१५ च्या सुमारास गांधीबाग झोनमधील रियाज लॉन कळमना मार्केट जवळ एमएच ४८ बीएम १२३१ क्रमांकाच्या ट्रकमधून ५.५० लाख किमतीचे प्रतिबंधित ४.५० टन नॉन ओवेन प्लास्टिक व ट्रक जप्त केला. झोनमधील एनडीएस प्रमुख सुशील तुप्ते आणि त्यांच्या पथकाद्वारे ही कारवाई करण्यात आली.
तिबंधित प्लास्टिक कॅरी बॅगने भरलेली गाडी छत्तीसगड येथील मारुती नॉन ओव्हन प्लास्टिक लिमिटेड, राजनांदगाव येथून आली होती. ही गाडी १० जानेवारीला राजनांदगाव येथून निघाली आणि १२ जानेवारीला नागपुरात पोहचताच पथकाने कारवाई करून साडेपाच लाखाचा माल जप्त केला. गाडी चालकाचे नाव रवींद्र पाल असून गाडीचे कागदपत्र तापासल्यानंतर हा सर्व माल इतवारी येथील तीन नल चौकात राखी टेक्सटाईल्स येथे पाठवला जात होता. राखी टेक्सटाईल्स मधून नागपूर शहरातील इतर भागात या प्लॉस्टिक कॅरीबॅगचा पुरवठा केला जाणार होता. शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांनी दिलेल्या सुचनेनूसार वाहन गांधीबाग झोनमध्ये आणण्यात आले. कारवाईची माहिती अप्पर आयुक्त राम जोशी आणि घनकचरा व्यवस्थापन उपायुक्त डॉ प्रदीप दासरवार यांना देण्यात आली. काही वेळातच गांधीबाग झोनचे सहायक आयुक्त अशोक पाटील व झोन अधिकारी सुरेश खरे घटनास्थळी पोहचले. नविन वर्षतील ही सर्वात मोठी कारवाई आहे.