शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील साडेचारशे शाळा बंद पडणार; समुह शाळांच्या निर्णयाचा फटका

By गणेश हुड | Updated: September 29, 2023 16:03 IST

हजारो शिक्षक अतिरिक्त ठरण्याची शक्यता

नागपूर :शिक्षण आयुक्तालयाच्या समुह शाळेच्या निर्णयामुळे नागपूर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या कमी पटसंख्येच्या ४५० शाळा बंद पडण्याची शक्यता आहे. असे झाले तर ग्रामीण भागातील गोरगरीबांच्या मुलांना शिक्षण घेणे अवघड होणार आहे. समुह शाळेच्या गोंडस नावाखाली २० पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याचा घाट घातला जात आहे.

 विद्यार्थ्यांचे सामाजिकरण , निकोप स्पर्धा खिलाडू वृत्ती व सुविधा उपलब्धतेचे कारण देत सुविधायुक्त व मध्यवर्ती शाळांना परिसरातील २० पेक्षा कमी पटसंख्येच्या  शाळा जोडण्याचे प्रस्ताव सादर करण्याबाबतचे निर्देश शिक्षण आयुक्तालयाकडून सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.

त्यानुसार राज्यातील २० पेक्षा कमी पटसंख्येच्या १४,७८३ शाळा परिसरातील मोठ्या शाळांना जोडण्यात येणार आहे. अर्थात या शाळा बंद करण्याचा शासनाचा डाव असल्याचा संशय शिक्षकांकडून व्यक्त केल्या जात आहे. या निर्णयामुळे ग्रामीण भागातील खासगी शाळांना बळ मिळणार आहे. नागपूर जिल्हा परिषदेच्या १५१६ शाळा आहेत. त्यापैकी कमी पटसंख्येच्या जवळपास ५०० शाळांवर संकट येण्याची शक्यता आहे. 

 शासनाच्या या निर्णयामुळे या शाळांमधील एक लाख ८५ हजार विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या नियमितीकरणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शासनाच्या निर्णयामुळे दुर्गम भागातील गावं , वाडी वस्ती व तांड्यावरील दीनदलीत  गोरगरीब  व बहुजनांची मुलं शिक्षणापासून वंचित ठरतील अशी भिती अनेक सामाजिक संघटना , शिक्षक संघटना व शिक्षणतज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

शसनाचा निर्णय अव्यवहार्य

शासनाचा हा निर्णय बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाच्या अधिकार अधिनियमातील तरतुंदीचे उल्लंघन करणारा आहे. दुर्गम भागातील गावे , वाड्या ,वस्ती वरील गोरगरिबांच्या मुलांच्या शिक्षणाच्या मार्गात खोडा घालणारा आहे, ही मुले शिक्षणापासून वंचित राहतील. त्यामुळे समुह शाळा स्थापनेचा  निर्णय अव्यवहार्य , आभासी व अनाकलनीय असल्याने शासनाने तो  मागे घ्यावा.  

- लीलाधर ठाकरे, जिल्हाध्यक्ष,महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती

टॅग्स :Educationशिक्षणzp schoolजिल्हा परिषद शाळाSchoolशाळाnagpurनागपूरStudentविद्यार्थी