माजी पंतप्रधान पी.व्ही. नरसिंह राव यांचे ओएसडी राम खांडेकर यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 12:59 IST2021-06-09T07:27:18+5:302021-06-09T12:59:26+5:30
Nagpur News माजी पंतप्रधान पी.व्ही. नरसिंह राव यांचे ओएसडी म्हणून कार्य केलेले राम खांडेकर (८७) दीर्घ आजाराने निधन झाले.

माजी पंतप्रधान पी.व्ही. नरसिंह राव यांचे ओएसडी राम खांडेकर यांचे निधन
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : माजी पंतप्रधान पी.व्ही. नरसिंह राव यांचे ओएसडी म्हणून कार्य केलेले राम खांडेकर (८७) दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा मुकुल, सून संगीता आणि दोन नातवंडे, गौरंग आणि जान्हवी आहेत.
राम खांडेकर यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे खाजगी सचिव म्हणून काम पाहिले होते. १९९१ साली जेव्हा राव पंतप्रधान झाले तेव्हा खांडेकर हे त्यांचे सर्वात विश्वासार्ह मानले गेले.