माजी भारतीय क्रिकेटपटू चेक बाऊन्स प्रकरणात अडकला
By योगेश पांडे | Updated: January 31, 2024 11:27 IST2024-01-31T11:26:55+5:302024-01-31T11:27:15+5:30
बजाजनगर पोलिसांनी वैद्यला बुधवारी सकाळी घरून कोर्टात नेले.

माजी भारतीय क्रिकेटपटू चेक बाऊन्स प्रकरणात अडकला
नागपूर : माजी भारतीय क्रिकेटपटू प्रशांत वैद्य याला चेक बाऊन्स प्रकरणात पोलिसांनी न्यायालयासमोर सादर केले. वैद्यविरोधात चेक बाऊन्सचे जुने प्रकरण होते. या प्रकरणात कोर्टात हजर राहण्यासाठी अनेकदा नोटीस पाठविण्यात आली होती.मात्र त्याला प्रतिसाद न दिल्याने न्यायालयाने वॉरंट जारी केला होता.
बजाजनगर पोलिसांनी वैद्यला बुधवारी सकाळी घरून कोर्टात नेले. बजाजनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठलसिंग राजपूत यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. दरम्यान प्रशांत वैद्यला अटक झाल्याच्या चर्चा होत्या. परंतु कुठलीही अटक झालेली नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.