शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
5
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
6
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
7
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
8
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
9
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
10
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
11
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
12
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
13
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
14
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
15
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
16
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
17
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
18
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
19
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
20
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
Daily Top 2Weekly Top 5

एमएस्सीचा पेपर घेण्याचा विद्यापीठाला विसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : सबकुछ ऑनलाईनमुळे विद्यार्थ्यांना वर्ग किंवा परीक्षेचा विसर पडताना दिसून येत आहे. मात्र राष्ट्रसंत तुकडोजी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : सबकुछ ऑनलाईनमुळे विद्यार्थ्यांना वर्ग किंवा परीक्षेचा विसर पडताना दिसून येत आहे. मात्र राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला चक्क नियोजित वेळेवर विद्यार्थ्यांची परीक्षाच न घेण्याचा अजब प्रकार समोर आला आहे. एमएसस्सीच्या (फॉरेन्सिक सायन्स) चौथ्या सत्राचा पेपर वेळेवर सुरू न झाल्याने विद्यार्थी हैराण झाले होते. यासंदर्भात चाचपणी केली असता विद्यापीठाकडून प्रश्नपत्रिकाच अपलोड करण्यात आली नव्हती अशी माहिती कळाली आहे. या प्रकारामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे.

उन्हाळी परीक्षा सुरू असून एमएस्सी (फॉरेन्सिक सायन्स) च्या चौथ्या सत्राचा शुक्रवारी अखेरचा पेपर होता. विद्यापीठाच्या वेळापत्रकानुसार फाऊंडेशन कोर्सचा पेपर दुपारी तीन ते सायंकाळी सहा या कालावधीत होणार होता. परंतु पेपर सुरूच झाला नाही. विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांत विचारणा केली, मात्र शिक्षकांनादेखील नेमका प्रकार कळत नव्हता. दोन तास प्रतीक्षा केल्यानंतर विद्यापीठाच्या हेल्पलाईनवर संपर्क साधण्यात आला व विचारणा करण्यात आली. परंतु विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी बनविण्यात आलेल्या मदत केंद्रातून त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. सायंकाळी सहा वाजता विद्यार्थ्यांनी लोकमतशी संपर्क केला.

यानंतर परीक्षा व मूल्यमापन संचालक डॉ. प्रफुल्ल साबळे यांना विचारणा केली असता त्यांनी तात्काळ चौकशी केली. त्यात विद्यार्थ्यांची तक्रार योग्य असल्याचे समोर आले. त्यांनी तातडीने सूत्रे हलविली व सायंकाळी ६.२५ वाजता विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रश्नपत्रिका अपलोड करण्यात आली.

मदतकेंद्र काय कामाचे ?

विद्यार्थ्यांना परीक्षेदरम्यान मदत मिळावी यासाठी मदतकेंद्र उभारण्यात आले आहे. मात्र या केंद्राबाबत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आहेत. ऐन अडचणीच्या वेळी तेथून मदत मिळत नाही व परीक्षा विभागातील कर्मचारीदेखील योग्य प्रतिसाद देत नाहीत. विद्यार्थ्यांच्या हितासाठी असलेल्या केंद्रावर वेळेत सहकार्य का मिळत नाही याचे उत्तर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडेदेखील नाही.