शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: हवेतच एकमेकांना धडकले अमेरिकेचे दोन फायटर जेट्स! एअर शो दरम्यान थरार; ४ पायलट चमत्कारीकरित्या बचावले
2
LPG Gas Crisis : एलपीजी सिलिंडरची परिस्थिती तशीच राहणार का? पुरवठा आणि दरांबाबत आली सर्वात मोठी अपडेट
3
आजचे राशीभविष्य, १८ मे २०२६: आर्थिक लाभाचा योग, पण आर्थिक व्यवहार सावधपणे करा; काय सांगतेय तुमची राशी?
4
दरवाढीनंतर आज किती रुपयांना मिळतंय पेट्रोल-डिझेल? जाणून घ्या तुमच्या शहरातील ताजे दर...
5
"लवकर निर्णय घ्या, नाहीतर काहीच शिल्लक राहणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला थेट विनाशाची धमकी
6
पेट्रोल-डिझेल खिसा कापणार?- आकड्यांचं गणित पाहा!
7
कसली आलीय मंदी... कोल्हापुरात जावयाच्या चप्पलसाठी वापरली चक्क दीड किलोची चांदी
8
मान्सून उंबरठ्यावर तरी महाराष्ट्र अजून तापलेलाच! १५ शहरांत पारा ४० पार
9
'केमिस्ट्री'च्या गुणांचे भाकीत नडणार; क्लासेस, पालक, विद्यार्थीही रडारवर!
10
सीबीएसईचा विद्यार्थ्यांना दिलासा; पुनर्मूल्यांकन शुल्कात मोठी कपात
11
यूएईमध्ये अणुऊर्जा प्रकल्पावर हल्ला; युद्ध भडकण्याची चिन्हे
12
‘गुलदार’ समुद्रतळाशी स्थापित करण्यास आज प्रारंभ; अंडरवॉटर म्युझियम, आर्टिफिशिल रीफ आकर्षण
13
मामाला भेटायला आलेल्या अल्पवयीन मुलीवर कल्याण रेल्वे यार्डात अत्याचार
14
बीएससीच्या हजारो विद्यार्थ्यांचे निकाल राखीव; एबीसी आयडी सादर न केल्याने विद्यापीठाचे पाऊल
15
संपादकीय: आपत्तीच्या दशकाची डायरी
16
बेजबाबदार परीक्षा यंत्रणांना लाज कशी वाटत नाही?
17
राज्यातील तब्बल ७० लाख शेतकऱ्यांच्या हाती सातबारा; सुटला तलाठ्याचा फेरा, ‘ई-पीक पाहणी’ मोबाइल ॲपचा वाढला वापर
18
विधान परिषदेत ठाकरेंची केवळ ३१.५८% उपस्थिती ; सदस्यांच्या उपस्थितीची आकडेवारी आली समोर
19
माणसांची सुट्टी! एआय स्वतःच स्वतःला देणार जन्म; 'रिकर्सिव्ह सुपरइंटेलिजन्स'ला मोठा निधी
20
केरळमध्ये सतीशन यांचा 'अल्ट्रा मॉडर्न' फॉर्म्युला! २० पैकी १४ मंत्री नवे चेहरे, आज शपथविधी होणार
Daily Top 2Weekly Top 5

फॉरेस्ट कॉलनीतच जंगल

By admin | Updated: May 20, 2014 00:54 IST

वन विभागाची इंदोरा परिसरातील फॉरेस्ट कॉलनी सध्या विविध समस्यांचा सामना करीत आहे. वन विभागाने गत अनेक वर्षांपूर्वी या कॉलनीचे निर्माण करून,

वन कर्मचार्‍यांच्या क्वॉर्टरची दुरवस्था : अनेक वर्षांपासून दुरुस्ती नाही

नागपूर : वन विभागाची इंदोरा परिसरातील फॉरेस्ट कॉलनी सध्या विविध समस्यांचा सामना करीत आहे. वन विभागाने गत अनेक वर्षांपूर्वी या कॉलनीचे निर्माण करून, येथे वन कर्मचार्‍यांसाठी राहण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. परंतु या कॉलनीची योग्य देखभाल व दुरुस्ती होत नसल्याने, येथील क्वॉर्टरची वाईट स्थिती झाली आहे. दुसरीकडे काही वन अधिकारी राजकीय नेत्यांच्या दबावात येथील क्वॉर्टर आरटीओला (ग्रामीण) देण्याचे षड्यंत्र रचत असल्याचा आरोप केला जात आहे. यावर काही वन कर्मचार्‍यांनी न्यायालयात जाण्याची तयारी सुरू केली आहे. ‘लोकमत’ प्रतिनिधीने या कॉलनीला प्रत्यक्ष भेट देऊ न येथील समस्यांचा आढावा घेतल्यावर, या कॉलनीची योग्य देखभाल न झाल्यामुळे क्वॉर्टरची स्थिती वाईट झाल्याचे दिसून आले. असे असताना, अनेक वन कर्मचारी या कॉलनीत राहत आहे. कॉलनीतील रस्ता पूर्णत: खराब झाला आहे. शिवाय त्यावर कुठेही पथदिवे दिसून येत नाही. येथील नागरिकांच्या मते, गत २५ वर्षांत येथील क्वॉर्टरची कोणतीही दुरुस्ती झालेली नाही. मात्र प्रत्येक महिन्याला वन कर्मचार्‍यांच्या वेतनातून देखभाल खर्च वसूल केला जातो. येथील महिलांच्या मते, पावसाळ्यात येथील बहुतांश क्वॉर्टरच्या छतातून पाण्याची गळती होते. त्यामुळे घरात ठिकठिकाणी भांडी ठेवावी लागतात. शिवाय परिसरातील डीपी उघड्यावर पडली आहे. त्यामुळे अनेकदा वीजपुरवठा खंडित होतो. क्वॉर्टरच्या अनेक खिडक्यांची तावदाने फुटलेली आहेत. अनेकांच्या घरातील बाथरूमचे दरवाजे तुटले आहेत. याविषयी वन विभागाला अनेकदा तक्रारी करूनही दुरुस्ती केली जात नसल्याचे महिलांनी सांगितले. येथील इमारत क्रमांक २ मधील एका महिलेच्या मते, या कॉलनीत एक पंप हाऊ स तयार करण्यात आले आहे. त्या पंप हाऊ सपर्यंत मनपाचे नळ कनेक्शन जोडण्यात आले आहे. मात्र पिण्याच्या पाण्यासाठी कोणतीही व्यवस्था केलेली नाही.