शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील अलंकार चित्रपटगृहाचा बळजबरीने ताबा घेतला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 16:07 IST

भाड्याने दिलेल्या अलंकार चित्रपटगृहाचा मुळमालकीण आणि तिच्या नातेवाईकांनी जबरदस्तीने ताबा घेतला. त्यानंतर भाडे करारानुसार खर्च झालेली रक्कम परत करण्याचे आश्वासन देऊनही ती परत करण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे भाडेकरूने सीताबर्डी पोलिसांकडे धाव घेतली.

ठळक मुद्देभाडेतत्वाचा करार वाद : तरुणीसह दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भाड्याने दिलेल्या अलंकार चित्रपटगृहाचा मुळमालकीण आणि तिच्या नातेवाईकांनी जबरदस्तीने ताबा घेतला. त्यानंतर भाडे करारानुसार खर्च झालेली रक्कम परत करण्याचे आश्वासन देऊनही ती परत करण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे भाडेकरूने सीताबर्डी पोलिसांकडे धाव घेतली.पोलिसांच्या माहितीनुसार, प्रियंका महेस्कर यांच्या वडीलांनी अनेक वर्षांपूर्वी अंबाझरी मार्गावर अलंकार चित्रपटगृह सुरू केले होते. वडिलोपार्जित हक्कानुसार, सध्या त्या चित्रपटगृहाचा मालकीहक्क प्रियंका महेस्कर यांच्याकडे आहे. चित्रपटगृहाची अंतर्गत सजावट करून ते भाड्याने देण्याचा करार प्रियंका यांनी तीन महिन्यांपूर्वी निखील अशोकराव लाड (वय ४०) यांच्यासोबत केला. त्यानुसार, अंतर्गत सजावटीवर लाड यांनी २५ ते ३० लाख रुपये खर्च केले. सोबतच ४० हजार रुपये महिना किरायाही देऊ लागले. मध्यंतरी लाड आणि महेस्कर तसेच त्यांचे आतेभाऊ बाबा मदन पाटील, कपील मदन पाटील आणि मृदल मदन पाटील यांच्यासोबत या भाडेकरारावरून वाद सुरू झाला. तो टोकाला पोहचला. या पार्श्वभूमीवर, १२ जानेवारीच्या पहाटे २.३० वाजता प्रियंका, बाबा, कपिल आणि मृदल पाटील आपल्या पाच ते सात साथीदारांसह अलंकार चित्रपटगृहात पोहचले. पहाटेच्या वेळी चौकीदाराव्यतिरिक्त कुणी नसल्याने त्यांनी चित्रपटगृहाचा ताबा घेतला. ते कळताच भल्या सकाळी लाड यांनी त्यांना विचारणा केली. यावेळी काही मध्यस्थांमार्फत महेस्कर, पाटील आणि लाड तसेच त्यांच्या सहका-यांची बैठक झाली. या बैठकीत लाड यांचे खर्च झालेली सर्व रक्कम परत करण्याची आरोपींनी हमी दिली. मात्र, आता तीन आठवडे होत आले तरी त्यांनी लाड यांना त्यांची रक्कम परत केली नाही. उलट त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. त्यावरून लाड यांनी बुधवारी सायंकाळी सीताबर्डी ठाण्यात धाव घेतली.ठाण्यातही समेटाचे प्रयत्नगुन्हा दाखल होणार असे कळाल्यानंतर आरोपी महेस्कर, पाटील आणि त्यांच्या सहका-यांनी पोलीस ठाण्याच्या आवारातही लाड यांच्यासोबत समेटाचे प्रयत्न केले. मात्र, आपली रक्कम परत करणार नाही, अशी खात्री पटल्यामुळे लाड यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनी विविध कलमानुसार, उपरोक्त आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. वृत्त लिहिस्तोवर आरोपींना अटक झालेली नव्हती.

टॅग्स :nagpurनागपूरCrimeगुन्हा