नागपुरात लॉटरी सेंटरच्या आड मटका अड्डा : २० जणांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 00:47 IST2019-03-13T00:47:07+5:302019-03-13T00:47:59+5:30
लॉटरी सेंटरच्या आड मटका अड्डा चालविणाऱ्या आरोपीला तसेच त्याच्याकडे मटक्याची लगवाडी करणाऱ्या १९ जणांना गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी दुपारी ३.४५ च्या सुमारास अटक केली.

नागपुरात लॉटरी सेंटरच्या आड मटका अड्डा : २० जणांना अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लॉटरी सेंटरच्या आड मटका अड्डा चालविणाऱ्या आरोपीला तसेच त्याच्याकडे मटक्याची लगवाडी करणाऱ्या १९ जणांना गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी दुपारी ३.४५ च्या सुमारास अटक केली.
विजय मुळे असे मुख्य आरोपीचे नाव आहे. त्याचे कमाल चौकातील शनिचरा मार्केटमध्ये मुळे लॉटरी सेंटर आहे. आरोपी मुळे लॉटरी सेंटरच्या आड मटक्याचा अड्डा चालवतो, अशी माहिती गुन्हे शाखेचे उपायुक्त नीलेश भरणे यांना मिळाली. त्यावरून त्यांनी आज दुपारी गुन्हे शाखेच्या पथकाला तेथे छापा टाकण्याचे आदेश दिले. पोलिसांनी तेथे छापा घालून मुळेसोबत दिलीप प्रल्हाद घुटके, कमलेश चरणदास बागडे, सुरेश नत्थूजी भारती, अतुल अशोक चवरे, गणेश गिरधर समर्थ, रामेश्वर मणीराम मडावी, गजानन महादेव शेंडे, दशरथ गोपीचंद मोरघडे, यशवंत विठोबाजी दंडारे, कमलेश प्रभाकर धर्मे, प्रभाकर निरगुजी धांडे, विवेक विठ्ठल चहांदे, अमित सतीश मुळे, राजेंद्र बिसन बोंडे, अशोक हरिचंद भलावी, गोवनदीप डेलनप्रसाद विश्वकर्मा, राजेश दौलत सोरते, अमोल भीमराव डोंगरे आणि सदानंद पंढरी पांडे यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ६९,२८० रुपये, ११ मोबाईल, ५ दुचाकी वाहने असा एकूण ३ लाख ६ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींविरुद्ध पाचपावली ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलीस उपायुक्त नीलेश भरणे, सहायक आयुक्त सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नरेंद्र हिवरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कामगिरी बजावली.