शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: हवेतच एकमेकांना धडकले अमेरिकेचे दोन फायटर जेट्स! एअर शो दरम्यान थरार; ४ पायलट चमत्कारीकरित्या बचावले
2
NEET Paper Leak : पेपर विकणारेच नाही तर, लाखो रुपये खर्च करून विकत घेणारे पालकही सीबीआयच्या निशाण्यावर!
3
LPG Gas Crisis : एलपीजी सिलिंडरची परिस्थिती तशीच राहणार का? पुरवठा आणि दरांबाबत आली सर्वात मोठी अपडेट
4
​अमरावती हादरली! जुन्या वादातून तेजसची सपासप वार करत हत्या; गुन्हा दाखल होण्यापूर्वीच गुन्हे शाखेकडून ३ आरोपींना २ तासांत बेड्या
5
आजचे राशीभविष्य, १८ मे २०२६: आर्थिक लाभाचा योग, पण आर्थिक व्यवहार सावधपणे करा; काय सांगतेय तुमची राशी?
6
दरवाढीनंतर आज किती रुपयांना मिळतंय पेट्रोल-डिझेल? जाणून घ्या तुमच्या शहरातील ताजे दर...
7
"लवकर निर्णय घ्या, नाहीतर काहीच शिल्लक राहणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला थेट विनाशाची धमकी
8
पेट्रोल-डिझेल खिसा कापणार?- आकड्यांचं गणित पाहा!
9
कसली आलीय मंदी... कोल्हापुरात जावयाच्या चप्पलसाठी वापरली चक्क दीड किलोची चांदी
10
मान्सून उंबरठ्यावर तरी महाराष्ट्र अजून तापलेलाच! १५ शहरांत पारा ४० पार
11
'केमिस्ट्री'च्या गुणांचे भाकीत नडणार; क्लासेस, पालक, विद्यार्थीही रडारवर!
12
सीबीएसईचा विद्यार्थ्यांना दिलासा; पुनर्मूल्यांकन शुल्कात मोठी कपात
13
यूएईमध्ये अणुऊर्जा प्रकल्पावर हल्ला; युद्ध भडकण्याची चिन्हे
14
‘गुलदार’ समुद्रतळाशी स्थापित करण्यास आज प्रारंभ; अंडरवॉटर म्युझियम, आर्टिफिशिल रीफ आकर्षण
15
मामाला भेटायला आलेल्या अल्पवयीन मुलीवर कल्याण रेल्वे यार्डात अत्याचार
16
बीएससीच्या हजारो विद्यार्थ्यांचे निकाल राखीव; एबीसी आयडी सादर न केल्याने विद्यापीठाचे पाऊल
17
संपादकीय: आपत्तीच्या दशकाची डायरी
18
बेजबाबदार परीक्षा यंत्रणांना लाज कशी वाटत नाही?
19
राज्यातील तब्बल ७० लाख शेतकऱ्यांच्या हाती सातबारा; सुटला तलाठ्याचा फेरा, ‘ई-पीक पाहणी’ मोबाइल ॲपचा वाढला वापर
20
विधान परिषदेत ठाकरेंची केवळ ३१.५८% उपस्थिती ; सदस्यांच्या उपस्थितीची आकडेवारी आली समोर
Daily Top 2Weekly Top 5

कामठी तालुक्यात बहरलेली फुलशेती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:15 IST

कामठी : लॉकडाऊनच्या अटी शिथिल झाल्याने बाजारपेठेत फुलांची मागणी वाढली आहे. त्यामुळे कामठी तालुक्यातील पवनगाव, धारगाव, लिहीगाव परिसरातील शेतकऱ्यांनी ...

कामठी : लॉकडाऊनच्या अटी शिथिल झाल्याने बाजारपेठेत फुलांची मागणी वाढली आहे. त्यामुळे कामठी तालुक्यातील पवनगाव, धारगाव, लिहीगाव परिसरातील शेतकऱ्यांनी चांगल्या उत्पन्नांच्या अपेक्षेने फुलशेतीकडे मोर्चा वळविला आहे.

गतवर्षी कोरोना महामारीमुळे लॉकडाऊन करण्यात आला. यामुळे बाजारपेठा बंद झाल्या. लग्नसमारंभ, मंदिर, उत्सव सणावर विरजन पडल्याने फुलांची मागणी कमी झाली. यामुळे शेतकऱ्यांनी शेतात ट्रॅक्टर फिरवून फुलशेती मोडली होती. यंदा कामठी तालुक्यातील ३७३ हेक्टरमध्ये फुलशेतीचे उद्दिष्ट आहे. पवनगाव, धारगाव, लिहीगाव, शिरपूर, तरोडी परिसरातील शेतकऱ्यांनी पालेभाज्या, भुईमूग, मूग, उडीद पिकाकडे पाठ फिरवून फुलांपासून चांगले उत्पादन होईल या हेतूने गेंदा, शेवंती, डीजी, मोगरा, गुलाब, लीली विविध फूल प्रकाराच्या शेतीचे नियोजन केले आहे. सध्या गेंदा, शेवंती, गुलाब या फुलांना बाजारपेठेत चांगले भाव मिळत असल्याचे पवनगाव येथील घनश्याम गेडाम यांनी सांगितले. त्यांनी चार एकर शेतामध्ये शेवंती, गेंदा या फुलशेतीची लागवड केली आहे. सोबतच पवनगाव, घारगाव परिसराला नागपूर येथील फूल मार्केटजवळ असल्यामुळे दररोजच शेतातील फुले तोडून मार्केटमध्ये पोहोचविण्यात येत असतात. त्यामुळे यावर्षी रब्बी हंगामात फुलशेतीतून चांगले उत्पन्न मिळण्याच्या अपेक्षेने शेतकऱ्यांचा कल याकडे आहे. लॉकडाऊनमुळे गतवर्षी झालेले फुलशेतीचे नुकसान यंदा भरून निघेल, असे लिहिगाव येथील शेतकरी गणेश झोड व नेरी येथील डुमदेव नाटकर यांनी सांगितले.