उपराजधानीत पाच ठिकाणी आग
By Admin | Updated: June 7, 2014 02:18 IST2014-06-07T02:18:02+5:302014-06-07T02:18:02+5:30
शहरातील वेगवेगळ्या पाच ठिकाणी आग लागण्याच्या घटना घडल्या. यात विद्युत मीटर,

उपराजधानीत पाच ठिकाणी आग
रामनगरात विद्युत मीटरमध्ये आग : ईश्वरनगरात सिलिंडर लिकेज
नागपूर : शहरातील वेगवेगळ्या पाच ठिकाणी आग लागण्याच्या घटना घडल्या. यात विद्युत मीटर, ट्रान्सफार्मरसह, गवत व झाडांनाही आग लागली.
अग्निशमन विभागातील सूत्रानुसार शुक्रवारी सकाळी ११.३0 वाजता रामनगर चौकातील संजीवनी हॉस्पिटलमधील ‘थ्री फेस’ विद्युत मीटरमध्ये अचानक आग लागली. त्यामुळे रुग्णालयातील वायरिंगसह १५ हजार रुपयाचे नुकसान झाले. यानंतर सकाळी ११.३५ वाजता रमणा मारोती रोड ईश्वरनगर येथील प्लॉट क्र. ५३येथील रहिवासी असलेल्या चिंधुजी तिरवाडी यांच्या स्वयंपाक घरातील सिलिंडर लिकेज असल्याने लागलेल्या आगीत ५ हजार रुपयांच्या वस्तू जळाल्या.
दुपारी १.३0 वाजता लकडगंज येथील हरीहर मंदिर रोडवरील हल्दीराम फॅक्टरीजवळ असलेल्या विद्युत ट्रान्सफार्मरला आग लागली. सायंकाळी ५.३0 वाजता वर्धा रोड खापरी डेपोच्या कम्पाऊंड वॉलला लागून असलेल्या झुडपाला आग लागली. रात्री ९.३0 वाजताच्या सुमारास सिव्हील लाईन्स सी.पी. क्लब जवळील विभागीय आयुक्तांच्या बंगल्याजवळील गवताला आग लागली. रात्री उशिरापर्यंत आग आटोक्यात आणण्यात आली. (प्रतिनिधी)