शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
2
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
3
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
4
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
5
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
6
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
7
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
8
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
9
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
10
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
11
ठेकेदाराच्या निष्काळजीपणाने चव्हाण कुटुंबाचा 'आधार' गेला; क्रेन पडून पोलिसाचा मृत्यू
12
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
13
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
14
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
15
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
16
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
17
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
18
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
19
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
20
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
Daily Top 2Weekly Top 5

पाच लाखांसह दुचाकी पळविली

By admin | Updated: April 8, 2016 02:35 IST

व्यापाऱ्याच्या नोकरांना मारहाण करून ५ लाखांची रोकड लुटून नेल्याची घटना गुरुवारी दुपारी ३ ते ३.१५ च्या सुमारास सेंट्रल एव्हेन्यूवर घडली.

लोखंडी सळीने केले वार : सेंट्रल एव्हेन्यूवर थरार नागपूर : व्यापाऱ्याच्या नोकरांना मारहाण करून ५ लाखांची रोकड लुटून नेल्याची घटना गुरुवारी दुपारी ३ ते ३.१५ च्या सुमारास सेंट्रल एव्हेन्यूवर घडली. दिवसाढवळ्या वर्दळीच्या भागात घडलेल्या या घटनेत अनेक संशयास्पद दुवे आहे. त्यामुळे उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. छापरूनगर, लकडगंज भागात राहणाऱ्या नरेश रजई नामक व्यापाऱ्याचे इतवारीत सराफा दुकान आहे. तेथे यशवंत खानोरकर आणि अभिमन्यू भारद्वाज काम करतात. मालकाने सांगितल्याप्रमाणे दुकानातील ५ लाखांची रोकड अ‍ॅक्टीव्हाच्या (एमएच ३१/ ५६८९) डिक्कीत घालून हे दोघे रजईच्या घराकडे जात होते. दुपारी ३.१५ च्या सुमारास ते सेंट्रल एव्हेन्यूवरील चंद्रहास बार समोर येताच दोन आरोपींनी अ‍ॅक्टीव्हावरील यशवंत आणि अभिमन्यूवर लोखंडी सळाखीने वार केला. त्यामुळे हे दोघे खाली पडले आणि आरोपींनी त्यांची दुचाकी घेऊन पळ काढला. यशवंतने लगेच आपल्या मालकाला फोनवरून या लुटमारीची माहिती दिली. त्यानंतर नियंत्रण कक्षात १०० क्रमांकावर फोन केला. नियंत्रण कक्षातील अधिकाऱ्याने या भागातील गस्तीवरील पोलीस पथकांना लुटमारीची माहिती देऊन तातडीने घटनास्थळावर पाठविले. त्यानुसार, तहसील तसेच लकडगंज पोलिसांचे गस्ती पथक घटनास्थळी आले. लकडगंजचे ठाणेदार सत्यवान माने आपल्या ताफ्यासह पोहचले. त्यांनी यशवंत आणि अभिमन्यूकडून आरोपींबाबत माहिती घेतल्यानंतर शहर पोलिसांना अ‍ॅक्टीव्हाच्या क्रमांकासह आरोपीचे वर्णन कळवून त्यांना पकडण्याच्या सूचना केल्या. दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेने संबंधितांमध्ये खळबळ उडाली. अतिरिक्त पोलीस आयुक्त श्रीकांत तरवडे, गुन्हेशाखेचे रंजनकुमार शर्मा, उपायुक्त अभिनाशकुमार यांनीही घटनास्थळ तसेच लकडगंज ठाण्यात भेट देऊन घटनेची माहिती घेतली. (प्रतिनिधी)काय आहे वास्तव ? या घटनेचे वास्तव, वृत्त लिहिस्तोवर स्पष्ट झाले नाही. मात्र, या संबंधाने संबंधीत वर्तुळात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. ही घटना घडली की घडवून आणण्यात आली, त्याबाबतही तर्कवितर्क लढवले जात आहे. पोलीस त्याचीही शहानिशा करीत आहेत. एका जणाच्या घरी लग्न असल्यामुळे त्याला देण्यासाठी आपण ही रक्कम यशवंत आणि अभिमन्यूच्या हाताने दुकानातून बोलवून घेतली होती, असे नरेश रजाईने पोलिसांना सांगितले. मात्र, ही रक्कम पाच लाख होती की ३५ लाख त्याबाबत वेगवेगळी चर्चा आहे. हवालाशीही हे प्रकरण जुळल्याची चर्चा आहे. दरम्यान, लकडगंज ठाण्यात रात्री ३९४ कलमानुसार लुटमारीचा गुन्हा दाखल करण्यात आला.