शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

पहिल्याच नगरपालिका निवडणुकीत कमळ फुललं, काँग्रेसला भोपळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2019 16:28 IST

भाजपाने 19 पैकी 17 नगरसेवक जिंकले असून राष्ट्रवादी काँग्रेसचा 2 जागांवर विजय झाला आहे.

नागपूर – स्थानिक स्वराज संस्थांमध्ये विजय मिळवण्याची भाजपाची घोडदौड सुरूच आहे. परभणीतील मानवत आणि नागपूरमधील बुटिबोरी नगरपरिषदच्या निवडणुकीत भाजपचं कमळ फुललं आहे. नागपूरमधील बुटिबोरी नगरपरिषदेत भाजपचा एकतर्फी विजय झाला आहे. विशेष म्हणजे काँग्रेसला येथे भोपळा म्हणजे एकही जागेवर विजय मिळवता आला नाही. नगराध्यक्षपदी भाजपचे बबलू गौतम विजयी झाले आहेत. 

भाजपाने 19 पैकी 17 नगरसेवक जिंकले असून राष्ट्रवादी काँग्रेसचा 2 जागांवर विजय झाला आहे. विशेष म्हणजे बुटीबोरी नगर परिषद स्थापनेनंतर ही पहिलीच निवडणूक घेण्यात आली. तसेच परभणीतील मानवतच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपचे सखाहरी पाटील विजयी झाले आहेत. काँग्रेसच्या पूजा खरात यांचा त्यांनी 9 हजार 439 मतांनी पराभव केला आहे. पाटील यांना 12 हजार 210 तर खरात यांना मिळाली 2 हजार 771 मते मिळाली आहेत.

नागपूर जिल्ह्यात नव्यानेच स्थापन झालेल्या बुटीबोरी नगर परिषद निवडणूकीत नगराध्यक्ष पदासह १६ जागावर भाजपने दमदार यश मिळविले आहे. नगराध्यक्ष पदाच्या निवडणूकीत भाजपचे राजेश (बबलु) मनोरंजन गौतम यांनी ६ हजार ९४७ मते मिळवित राष्ट्रवादीचे रामनारायण  (बल्लू) दशरथ श्रीवास यांचा ३ हजार ८६१ मतांनी पराभव केला. श्रीवास यांना ३०८६ मते मिळाली. काँग्रेसचे जाकीर (बाबू) सलाम पठाण यांना ३०२४ मते मिळाली. बुटीबोरी नगर परिषदेची पहिली सार्वत्रिक निवडणूक रविवारी पार पडली. यात नगराध्यक्ष आणि नऊ प्रभागातील १८ नगरसेवकांच्या निवडीसाठी एकूण २३,६६० मतदारांपैकी १४,७५७ मतदारांनी (६२.१० टक्के) मतदानाचा हक्क बजाविला होता.

नगराध्यक्ष पदासाठी भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी यांच्यात तिरंगी लढत झाली. येथे भाजप आणि सेनेची युती होती. कॉँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्र लढण्याने भाजप-सेना युतीला विजय खेचण्यात यश मिळाले. राष्ट्रवादीला येथे केवळ दोन जागावर यश मिळाले. काँग्रेसला मात्र एकाही जागेवर विजय मिळविता आला आहे. प्रदेश कॉँग्रेसचे सचिव मुजीब पठाण यांच्या नेतृत्त्वात काँग्रेसने येथे निवडणूक लढविली होती. त्यांचे बंधू जाकीर पठाण नगराध्यक्ष पदाचे उमेदवार होते. 

भाजपकडून पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि हिंगण्याचे आमदार समीर मेघे यांनी किल्ला लढविला. सेनेशी युती करण्यापासून तर उमेदवार जाहीर करेपर्यंत भाजपचे नियोजन होते. बुटीबोरीत कॉँग्रेस सुरुवातीपासूनच एकाही होती. कॉँग्रेस-राष्ट्रवादीने ही निवडणूक एकत्र लढावी यासाठी जिल्ह्यातील एकाही मोठ्या नेत्याने पुढाकार घेतला नाही. शेवटी पराभवाचा सामना करावा लागला. राष्ट्रवादीकडून माजी मंत्री रमेश बंग यांनी ताकद लावली. त्यांना दोन जागा मिळविण्यात यश आले.

टॅग्स :BJPभाजपाnagpurनागपूरulhasnagarउल्हासनगरElectionनिवडणूक