शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
9
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
10
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
11
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
12
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
13
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
14
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
15
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
16
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
17
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
18
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
19
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
20
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार

नागपूर जिल्ह्यातील पहिले ‘ग्रामसंवाद भवन’ शीतलवाडीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 11:01 PM

वैशिष्ट्यपूर्ण आणि नाविन्यपूर्ण काम करीत केवळ नागपूर जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात नाव उंचावलेल्या रामटेक तालुक्यातील शीतलवाडी ग्रामपंचायतने आणखी एक आगळेवेगळे पाऊल टाकले. त्यामुळे पुन्हा ग्रामपंचायतच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला. ग्रामपंचायतने ‘ग्रामसंवाद भवन’ उभारत सोमवारी (दि. २५) एका शानदार समारंभात लोकार्पण केले. एवढेच काय तर डिजिटल अंगणवाडी इमारतीचेही लोकार्पण यावेळी करण्यात आले.

ठळक मुद्दे डिजिटल अंगणवाडी इमारतीचेही लोकार्पण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वैशिष्ट्यपूर्ण आणि नाविन्यपूर्ण काम करीत केवळ नागपूर जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात नाव उंचावलेल्या रामटेक तालुक्यातील शीतलवाडी ग्रामपंचायतने आणखी एक आगळेवेगळे पाऊल टाकले. त्यामुळे पुन्हा ग्रामपंचायतच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला. ग्रामपंचायतने ‘ग्रामसंवाद भवन’ उभारत सोमवारी (दि. २५) एका शानदार समारंभात लोकार्पण केले. एवढेच काय तर डिजिटल अंगणवाडी इमारतीचेही लोकार्पण यावेळी करण्यात आले.शीतलवाडी ग्रामपंचायतने आतापर्यंत अनेक उपक्रम राबविले. त्यामुळेच या ग्रामपंचायतचे सर्वदूर नाव झाले आहे. तेथील विकास कामे आणि उपक्रमांची दखल सर्वस्तरावर घेतली जात आहे. अशात ग्रामपंचायतला १४ व्या वित्त आयोगातून मिळालेल्या निधीतून समाजभवन इमारत मंजूर झाली. त्या इमारतीत मोठे सभागृह असून, तेथे ग्रामस्थांशी संवाद साधला जाणार आहे. त्यामुळेच या इमारतीला ‘ग्रामसंवाद भवन’ हे नाव देण्यात आले. त्या इमारतीचे लोकार्पण करण्यात आले; सोबतच डिजिटल अंगणवाडीचे लोकार्पण करण्यात आले. ही डिजिटल अंगणवाडीही नाविन्यपूर्ण अशी असून, इमारतीच्या प्रत्येक भिंतीवर बालकांवर संस्कार करणारी चित्रे, प्रतिकृती रेखाटण्यात आल्या आहेत. नागरी सुविधा योजनेंतर्गत ५० लाखांच्या विविध विकास कामांचेही लोकार्पण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाला संसद आदर्श ग्राम समितीचे सदस्य तथा आदर्श ग्राम पाटोदा(जि. औरंगाबाद)चे सरपंच भास्करराव पेरे पाटील, खासदार कृपाल तुमाने, आ. डी. एम. रेड्डी, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष शरद डोणेकर, माजी आ. आशिष जयस्वाल, शीतलवाडीच्या सरपंच योगिता गायकवाड, उपसरपंच आशिष भोगे, जिल्हा परिषद सदस्य वर्षा धोपटे, पंचायत समिती सभापती किरण धुर्वे, सदस्य हरिसिंग सरोदे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.शीतलवाडी ग्रामपंचायतने आतापर्यंत राबविलेल्या विविध उपक्रमांचे सचित्र विवरण असलेल्या ‘ग्रामविकासाची यशोगाथा’ या पुस्तकाचे कार्यक्रमादरम्यान मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.ग्रामपंचायत कर्मचारी जगदीश खुडसाव, धनराज पालीवाल, अविनाश चन्ने, पार्वती सूर्यवंशी, रामकृष्ण वंजारी, जितेंद्र बेले, पुरुषोत्तम मोहनकार, पौर्णिमा गेडाम, माजी कर्मचारी नितीन बंडीवार, बांधकाम विभागाचे शाखा अभियंता निमजे यांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण मेहर, सुरेश वांदिले, गटविकास अधिकारी बाळासाहेब यावले, एकात्मिक बालसेवा प्रकल्प अधिकारी कर्णेवार, नायब तहसीलदार नितीन धापसे, रश्मी काठीकर, शालिनी शेंडे, सरपंच भगवान गोंगले, योगेश्वरी चोखांद्रे, किरण जयस्वाल, छाया वांढरे, नंदा मस्के, ताराचंद सलामे, मीनाक्षी वागधरे, पाचगावच्या सरपंच पुण्यशीला मेश्राम, शीतलवाडीचे ग्रामपंचायत सदस्य मंगेश भोजने, कृष्णा गेचुडे, मूलचंद यादव, विनोद सावरकर, उषा उईके, रंजना लेंडे, शैला अतकरे, निर्मला कोडवते, ग्रामविकास अधिकारी आर. डी. मोंढे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.शीतलवाडीचा आदर्श घ्या : कृपाल तुमानेशीतलवाडी ग्रामपंचायतने सर्वांगीण विकासावर अधिक भर दिला. त्यात आलेल्या अडचणीवर मात करीत प्रामाणिक प्रयत्न केले. त्यामुळेच या ग्रामपंचायतचा जिल्ह्यात दबदबा आहे. शीतलवाडी ग्रामपंचायतप्रमाणेच इतर ग्रामपंचायतींनीही वाटचाल करावी, अशी अपेक्षा खा. कृपाल तुमाने यांनी यावेळी व्यक्त केली. आदर्श ग्राम पाटोदाचे सरपंच भास्करराव पेरे पाटील यांनी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांमध्ये एकजूटता असावी. एकोप्यानेच गावाचा विकास साधता येतो, असे मत व्यक्त केले. माजी खा. जयस्वाल, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष शरद डोणेकर यांनीही समयोचित मार्गदर्शन केले. ग्रामस्थांनी विकासकामात सहकार्य करण्याचे आवाहन मान्यवरांनी केले.

टॅग्स :nagpurनागपूर