अगोदर ‘इन्स्टाग्राम’वर मैत्री, मग अल्पवयीन मुलीवर अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2023 20:17 IST2023-03-13T20:16:23+5:302023-03-13T20:17:01+5:30
Nagpur News अगोदर एका अल्पवयीन विद्यार्थिनीशी ‘इन्स्टाग्राम’वर मैत्री केल्यानंतर तिच्यावर अत्याचार करण्यात आले. विद्यार्थिनी गर्भवती झाल्याने आरोपीचे बिंग फुटले. बेलतरोडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

अगोदर ‘इन्स्टाग्राम’वर मैत्री, मग अल्पवयीन मुलीवर अत्याचार
नागपूर : अगोदर एका अल्पवयीन विद्यार्थिनीशी ‘इन्स्टाग्राम’वर मैत्री केल्यानंतर तिच्यावर अत्याचार करण्यात आले. विद्यार्थिनी गर्भवती झाल्याने आरोपीचे बिंग फुटले. बेलतरोडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
संबंधित १६ वर्षीय मुलीची आरोपी साहील नरेश सरकानिया (१९, कैकाडीनगर झोपडपट्टी) याच्याशी ओळख झाली. नरेश हा मूळचा उत्तर प्रदेशमधील अनुप नगर येथील रहिवासी आहे. संबंधित मुलगी तिच्या आजीच्या घरी राहते. एका वर्षापूर्वी मुलीची साहिलसोबत ‘इन्स्टाग्राम’वर ओळख झाली होती. यानंतर दोघेही एकमेकांशी बोलू लागले. जानेवारी २०२३ मध्ये साहिल नागपुरात आला आणि कैकाडी नगर झोपडपट्टीत भाड्याचे घर घेऊन राहू लागला. कॉलेज सुटल्यावर विद्यार्थिनीनेही साहिलच्या घरी जायला सुरुवात केली. यादरम्यान साहिलने तिच्यासोबत अनेकवेळा शारीरिक संबंध ठेवले. मात्र, शनिवारी सकाळी अल्पवयीन मुलाला उलट्या होऊ लागल्या. दुपारी रक्तस्राव झाल्यानंतर आजीने शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले व तेव्हा अल्पवयीन मुलगी अडीच महिन्यांची गरोदर असल्याचे निष्पन्न झाले. चौकशी केल्यानंतर अल्पवयीन मुलीने साहिलने अत्याचार केल्याची माहिती दिली. आजीच्या तक्रारीवरून पोलिसांनी साहिलविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली आहे.